27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषराहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !

बीसीसीआयकडून अंडर-१९ चा संघ जाहीर

Google News Follow

Related

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी समितला भारताच्या अंडर-१९ संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारत अंडर-१९ संघाची शनिवारी (३१ ऑगस्ट) घोषण केली. एकदिवसीय आणि चार दिवसीय अशा दोन्ही मालिकांसाठी समित द्रविडची निवड झाली आहे. या मालिकेत ५० षटकांचे तीन सामने आणि दोन चार दिवसीय सामने अनुक्रमे पुद्दुचेरी आणि चेन्नई येथे खेळवले जातील. एकदिवसीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अमानकडे तर चार दिवसीय संघाचे नेतृत्व सोहम पटवर्धनकडे असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ मालिका २१ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. १८ वर्षीय समित नुकताच म्हैसूर वॉरियर्सकडून महाराजा T२० ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. उजव्या हाताच्या फलंदाजाने लीगमध्ये आतापर्यंत ११४ च्या स्ट्राइक रेटने सात डावांत ८२ धावा केल्या होत्या.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिचा पहिला सामना २१ सप्टेंबरला, दुसरा सामना २३ तारखेला आणि तिसरा सामना २६ तारखेला होणार आहे. चार दिवसीय मालिकेतील पहिला सामना ३० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर आणि दुसरा सामना ७  ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. एकदिवसीय मालिका पुद्दुचेरीमध्ये खेळली जाईल, तर चार दिवसांची मालिका चेन्नईमध्ये खेळविली जाणार आहे.

हे ही वाचा : 

केदारनाथमध्ये बिघडलेले हेलीकॉप्टर उचलून नेताना दोर तुटला आणि…

प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही अतिरिक्त फास्ट ट्रॅक न्यायालये कार्यान्वित नाहीत

पावसाने झोडपल्यानंतर गुजरात किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

जितेश अंतापूरकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश !

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ: रुद्र पटेल (वीसी) (जीसीए), साहिल पारख (एमएएचसीए), कार्तिकेय केपी (केएससीए), मोहम्मद अमान (सी) (यूपीसीए), किरण चोरमले (एमएएचसीए), अभिज्ञान कुंडू ( WK) (MCA), हरवंशसिंग पनगालिया (WK) (SCA), समित द्रविड (KSCA), युधाजित गुहा (CAB), समर्थ एन (KSCA), निखिल कुमार (UTCA), चेतन शर्मा (RCA), हार्दिक राज (KSCA) ), रोहित राजावत (MPCA), मोहम्मद इनान (KCA)

चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ: वैभव सूर्यवंशी (बिहार सीए), नित्या पांड्या (बीसीए), विहान मल्होत्रा ​​(वीसी) (पीसीए), सोहम पटवर्धन (सी) (एमपीसीए), कार्तिकेय केपी (केएससीए), समित द्रविड (KSCA), अभिज्ञान कुंडू (WK) (MCA), हरवंश सिंग पनगालिया (WK) (SCA), चेतन शर्मा (RCA), समर्थ एन (KSCA), आदित्य रावत (CAU), निखिल कुमार (UTCA), अनमोलजीत सिंग ( PCA), आदित्य सिंग (UPCA), मोहम्मद इनान (KCA)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा