25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरविशेषजितेश अंतापूरकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश !

जितेश अंतापूरकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश !

उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

Google News Follow

Related

नांदेड जिल्ह्यातील देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार  अशोक चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर यांचा पक्ष प्रवेश पार पडला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने अंतापूरकर यांची हक्कालपट्टी केली. जितेश अंतापूरकर यांच्यासोबत झिशान सिद्दीकी यांनासुद्धा पक्षातून काढून टाकण्यात आले. जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यतेचा राजीनामा देत काल भाजपमध्ये प्रवेश केला. अंतापूरकर यांच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…

जाळपोळीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का ?

जिना नसले तर काय झाले? शरद पवार आहेत ना…

जबाबदारी घ्यावीच लागेल !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात भाजपाचा थोडक्यात पराभव झाला. आता नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील. अंतापुरकर यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहिल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, अंतापूरकर यांना काँग्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा भाजपाला फायदा होईल.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर म्हणाले की, पक्षाकडून जी जबाबदारी सोपविली जाईल ती आपण निष्ठेने पार पाडू. बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी, माजी नगराध्यक्षांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा