30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरक्राईमनामाब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित

ब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित

दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता

Google News Follow

Related

पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघाताप्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील तीन जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या तिघांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी अपघातानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

तीनही आरोपींचे निलंबन झाल्याचे ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी जाहीर केलं आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशी समिती कडून तपास करण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी म्हटले की, “डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणारा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केले आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे.”

हे ही वाचा:

‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!

पीएफआयचे माजी प्रमुख ई अबुबकर यांचा जामीनअर्ज फेटाळला!

उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!

राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!

दरम्यान ज्या रात्री कल्याणीनगरमध्ये हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्यांचा जबाबही पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. तसेच ज्या पोर्शे कारची धडक बसून हा अपघात झाला त्या कारची तपासणी होणार आहे. यासाठी पोर्शे कार कंपनीचे जर्मनीतील प्रतिनिधी गाडीच्या तपासणीसाठी पुण्यात येणार आहेत. सध्या ही कार येरवडा पोलिस ठाण्याबाहेर ठेवण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा