29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाफिनिक्स मॉलसमोरील उड्डाणपुलावर दोन दुचाकीस्वार झाले ठार...

फिनिक्स मॉलसमोरील उड्डाणपुलावर दोन दुचाकीस्वार झाले ठार…

Google News Follow

Related

लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील फिनिक्स मॉलच्या समोर असलेल्या उड्डाणपुलावर बुधवारी रात्री झालेल्या अपघातात मोटरसायकलवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला असून एक मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे.

पुलावर अचानक कार चालकाने चुकीचा यूटर्न घेतल्यामुळे हा अपघात झाला असून या प्रकरणी ना. म.जोशी मार्ग पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

वेश अरुण संघवी (२५) आणि कृष्णा कुराडकर (२६) असे या अपघातात मृत्यु झालेल्या मोटरसायकलवर असणाऱ्या दोघांची नावे आहेत. भावेश हा घाटकोपर भटवाडी आणि कृष्णा हा चेंबूर येथे राहण्यास होता. बुधवारी रात्री हे दोघे मोटरसायकलवरून वरळीच्या दिशेने सुसाट वेगाने जात असताना सेनापती बापट मार्ग फिनिक्स मॉलच्या समोर असलेल्या उड्डाणपूलावर वरळीच्या दिशेवरून येणाऱ्या एका कार चालकाने अचानक पुलावर यूटर्न घेतला असता सुसाट वेगाने येणाऱ्या भावेश याची मोटरसायकल कारचा मागच्या बाजूला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलवर धडकले.

हे ही वाचा:

महिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले?

जेंव्हा दिग्विजय सिंग रा. स्व. संघ आणि अमित शहांची स्तुती करतात

मोदींनी का केले किरण रिजिजूंचे कौतुक?

शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात

या अपघातात भावेश आणि कृष्णा गंभीर जखमी झाले. कार चालकाने कार न थांबवता तो दादरच्या दिशेने पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने नायर रुग्णालयात आणले असता एकाचा तत्पूर्वीच मृत्यू झाला होता तर दुसऱ्याचा मृत्यू उपचारादरम्यान झाला, अशी माहिती ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली. याप्रकरणी पोलिसानी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा