27 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामामैत्रिणीने आत्महत्या केल्याचे कळल्यावर तिनेही स्वतःला झोकून दिले

मैत्रिणीने आत्महत्या केल्याचे कळल्यावर तिनेही स्वतःला झोकून दिले

पोलिस करत आहेत या विचित्र घटनेचा तपास

Related

पुण्यात दाेन बालमैत्रिणींनी आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या हडपसर भागात सानिका हरिश्चंद्र भागवत (१९)  आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (१९ ) अशी या बाल मैत्रिणींची नावे आहेत. आपली मैत्रीण सानिकाने आत्महत्या केल्याचे पाहून आकांक्षानेही जीव दिला.

सानिकाने गळफास लावून आत्महत्या केली. मैत्रिणीचा मृत्यू बघून आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले.

या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. या आत्महत्ये मागचं नेमकं कारण समजू शकलेले नसून पाेलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.हडपसरमधील शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळच्या क्रिस्टल साेसायटीमध्ये ही घटना संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास  घडली.

सानिकाने घरातमध्ये साडीने गळफास लावून आत्महत्या केली. सारिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेत असतानाचे दृश्य आकांक्षाला बघवले गेले नाही. दु:ख सहन न झाल्याने तिने लगेचच बाजुच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची माहिती कळताच हडपसर पाेलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

हे ही वाचा:

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

सानिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेत असतानाच त्या रुग्णवाहिकेसमाेरच आकांक्षा वरून खाली पडली. गंभीर जखमी झालेल्या आकांक्षाचाही मृत्यू झाला. इतक्या कमी वयात आ त्महत्या करण्याच्या घटनेमुळे हडपसर भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे पाेलिसही चक्रावून गेले आहेत. या घटनेमागील कारण शाेधण्याचा पाेलिस प्रयत्न करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा