डोंबिवली शहरात एटीएसने केलेल्या कारवाईत शस्त्रासाठ्यासह दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून चार पिस्तूल आणि ३५ जिवंत काडतुसे जप्त केली.
डोंबिवली (पश्चिम) परिसरात एक संशयास्पद व्यक्ती बेकायदेशीर शस्त्रे घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती, यामहितीच्या आधारे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने महात्मा गांधी रोडवर सापळा रचून ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.
झडती दरम्यान पोलिसांना त्याच्या ताब्यातून तीन शस्त्रे आणि ३५ जिवंत काडतुसे सापडली. एटीएसने काळाचौकी युनिटमध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७ (१) (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक चौकशीदरम्यान त्याने ठाणे परिसरात दुसऱ्या व्यक्तीला शस्त्रे विकल्याची कबुली दिली.
कबुली जबाब आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे एटीएसने बुधवारी दुसऱ्या आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले, असे एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
…म्हणून प्रवासी वाचू शकले नाहीत!
विमान अपघात : एअर इंडियाचे सोशल मीडिया हँडल्स, वेबसाईट ‘ब्लॅक’
नागपाडा येथील डायना ब्रिजजवळ दिवसाढवळया सोने लुटले
अहमदाबाद विमान अपघातावर भारतीय क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त!
शस्त्रास्त्र जप्तीतील इतर धागेदोरे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे आणि शहरात शस्त्रांची तस्करी कुठून केली जात आहे आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी या प्रकरणात इतर आरोपींचाही समावेश आहे, असे वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकूण ४ बंदुका, ३५ जिवंत काडतुसे, २ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत ज्यांची किंमत अंदाजे ७.५ लाख रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
