31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरक्राईमनामामध्य प्रदेशातील दोन शूटर लपले होते मुंबईत

मध्य प्रदेशातील दोन शूटर लपले होते मुंबईत

कफ परेड पोलिसांनी जेरबंद केले

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील सतना येथे एअर फोर्सच्या अधिकाऱ्याच्या घराबाहेर देशी पिस्तुलातून पाच फैरी झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोलिसांवरही गोळीबार करण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक करून मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील कोनगवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जून रोजी ही घटना घडली होती. एअर फोर्स अधिकाऱ्याच्या घराबाहेर आरोपींनी देशी पिस्तुलातून पाच राऊंड फायरिंग केली होती. या प्रकरणी कोनगवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत पुढील लक्ष्य पोलीस असतील, अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी आपले मोबाईल फोन बंद करून फरार झाले होते.तांत्रिक तपासादरम्यान आरोपी मुंबईतील आझाद मैदान, एमआरए आणि कफ परेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती सतना पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्य प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आणि कफ परेड पोलिसांची मदत मागितली.

हे ही वाचा:

एअर इंडियाला तोट्याचा फटका

मे महिन्यात किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर

केन विल्यमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

काय दिवस आले… काँग्रेसला मजबूत करणार उबाठा?

कफ परेड पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने आरोपींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हालचालींचा माग काढला. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने काला घोडा परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली टाटा नेक्सॉन (क्रमांक एमपी १९ झेडएच ७७४२) ही कारही जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरसिंह अशोकसिंह परिहार (२५, रा. अकौना, जि. सतना) आणि अभिग्यान संकटमोचन त्रिपाठी (२३, रा. पतेरी, जि. सतना) यांचा समावेश आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळविण्यात आला असून मध्य प्रदेश पोलिसांचे पथक त्यांना पुढील तपासासाठी सतना येथे घेऊन रवाना झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा