26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामापुण्यात स्लॅब कोसळला; १२ जखमी

पुण्यात स्लॅब कोसळला; १२ जखमी

Related

पुण्यामधील बालेवाडीच्या पाटील नगर परिसरामध्ये एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पाटील नगर परिसरात शनिवारी (३० ऑक्टोबर) रात्री हा अपघात घडला. इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळाली आहे.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा अचानक स्लॅब कोसळल्याचे समजताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जखमी लोकांना दवाखान्यात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

हे ही वाचा:

चीनचे ‘काळे’ कारस्थान; अनेक मासे मृत

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

इमारतीच्या स्लॅबचा संपूर्ण लोखंडी सांगाडा कोसळल्याने आणि त्याखाली दबल्याने काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेविषयी अजूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा