25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरक्राईमनामाचेंबूरच्या वाशीनाका येथे गोळीबार, एक जखमी

चेंबूरच्या वाशीनाका येथे गोळीबार, एक जखमी

Related

चेंबूर वाशीनाका येथे सुरक्षा रक्षक एजन्सी चालवणाऱ्यावर मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने गोळीबार करून पोबारा केला आहे. या गोळीबारात एक जण किरकोळ जखमी असून त्याला उपचार करून सोडण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी वाशीनाका येथील म्हाडा वसाहत या ठिकाणी झालेल्या या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

रवींद्र गायकवाड (४५) ही व्यक्ती चेंबूर वाशीनाका, म्हाडा वसाहत या ठिकाणी सुरक्षा रक्षक एजन्सी चालवत आहे. सोमवारी सायंकाळी रवींद्र हे म्हाडा वसाहत या ठिकाणी असलेल्या कार्यालयात बसलेले असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोनजणांपैकी एकाने रिव्हॉल्व्हर मधून रवींद्र गायकवाड यांच्या दिशेने दोनगोळ्या झाडून पोबारा केला.

अगोदरच सावध असलेल्या रवींद्र यांच्या खांद्याला एक गोळी चाटून गेल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले आहे. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे ही वाचा:

कट्टरपंथी झाकीर नाईकच्या संघटनेवर भारतात बंदी

सरसंघचालक मोहन भागवतांची तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांशी भेट

बॅडमिंटनपटू श्रीकांत जागतिक स्पर्धेत रौप्य जिंकणारा पहिला भारतीय पुरुष

जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?

पोलिसांनी जखमी रवींद्र यांचा जबाब नोंदवून अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांना जवळपास असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती आरसीएफ पोलिसांनी दिली आहे.

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांपैकी एकाचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. हा हल्ला व्यवसायिक वादातून झाला असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा