27 C
Mumbai
Tuesday, February 17, 2026
घरक्राईमनामाव्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात जे घडलं ते वेगळंच होतं

व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात जे घडलं ते वेगळंच होतं

व्हायरल व्हिडिओमागील सत्य उघड

Google News Follow

Related

व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात तरुण- तरुणीने गोंधळ घालतानाचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. मात्र, या प्रकरणामागचे खरे सत्य समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश करांडे आणि त्याची मैत्रीण यांनी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा गोंधळ घातला होता. त्यांच्यावर गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई होऊ नये, यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यातच नाटक रचल्याचे उघड झाले आहे.

यश करांडे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो. एका कार्यक्रमात त्याने इव्हेंट मॅनेजर लोकेन्द्र राव यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे १,५०० रुपये थकवण्यात आले होते. यावरून संतापलेल्या यशने १८ सप्टेंबर रोजी राव यांच्या कार्यालयात घुसून दरवाजा फोडला व शिवीगाळ केली, असा आरोप आहे.

या प्रकरणी लोकेन्द्र राव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. राव यांना गोरेगाव येथील एका कार्यक्रमाचे व्यवस्थापनाचे काम मिळाले होते. कार्यक्रम आयोजकांनी स्टाफने पाहुण्यांसाठी ठेवलेले जेवण करू नये, अशी स्पष्ट सूचना दिली होती. मात्र, राव यांचा मित्र अक्षय जैन यांच्याकडून पाठवलेले यश करांडे, रुची पाल व इतरांनी जेवण केले. यामुळे आयोजकांनी राव यांना जाब विचारला. यावरून वाद निर्माण झाला होता.

नंतर, १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास यश करांडे आणि त्याचा मित्र जयेश कुमार सोनार यांनी राव यांच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून जबरदस्ती आत प्रवेश केला. राव यांचे मित्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच यशने त्यांनाही शिवीगाळ केली. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमधूनही याची पुष्टी झाली आहे.

हेही वाचा..

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळीराजाला २२१५ कोटींची मदत

‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’

“… अशा भाषेची गरज नाही!” शशी थरूर संतापले!

आयुष्मान भारत योजनेची सात वर्षे पूर्ण

यानंतर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर यश व त्याची मैत्रीण यांनी पोलिस आमची तक्रार घेत नाहीत असा आरोप करत गोंधळ घातला आणि मोबाईलवर व्हिडिओ शूट करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ड्युटीवरील पोलिसांनी मात्र दुसऱ्या तक्रारदाराचे जबाब नोंदवले जात असल्याचे सांगून थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितले होते. तरीही यश व त्याची मैत्रीण गैरवर्तन करत राहिले.

लोकेन्द्र राव यांच्या तक्रारीवरून आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी यश करांडे व जयेश कुमार सोनार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(४), ३२४(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा