24 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरक्राईमनामाअल्पसंख्याक दर्जा का काढून घेऊ नये....अल फलाहला नोटीस

अल्पसंख्याक दर्जा का काढून घेऊ नये….अल फलाहला नोटीस

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध असल्याने NCMEI कडून कारवाई

Google News Follow

Related

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध असल्याने अल- फलाह विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा का काढून घेतला जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस विद्यापीठाला बजावण्यात आली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाने (NCMEI) अल- फलाह विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात स्फोटकांसह गाडी चालवणारा डॉ. उमर नबी आणि आणखी एक आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई हे दोघे विद्यापीठात काम करत होते. या स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर फरीदाबादमधील अल- फलाह विद्यापीठ रडारवर आले आहे.

एएनआयने NCMEI च्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी NCMEI ने विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या रजिस्ट्रार तसेच हरियाणातील शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

भारतीय संविधानाच्या कलम ३० (१) मध्ये भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग (NCMEI) ही एक अर्ध- न्यायिक संस्था आहे आणि या उद्देशाने त्यांना न्यायनिवाडा, सल्लागार आणि शिफारस करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या सहा धार्मिक अल्पसंख्याक समुदायांना अधिसूचित केले आहे.

दरम्यान, गुरुवारी, मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू कॅन्टोन्मेंट बोर्डाने अल फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांची बेकायदेशीर वडिलोपार्जित मालमत्ता पाडून टाकण्याची नोटीस बजावली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ही रचना संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीवर उभारलेली बेकायदेशीर बांधकाम आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या नोटीसमध्ये मालमत्तेच्या रहिवाशांना आणि कायदेशीर वारसांना तीन दिवसांच्या आत बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अन्यथा कॅन्टोन्मेंट बोर्ड हटविण्याची कारवाई करेल.

हे ही वाचा:

तेजस अपघातात हुतात्मा झालेले हवाई दलाचे विंग कमांडर नमांश सियाल कोण होते?

“ती चूक होती आणि आता…” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय दिले उत्तर?

पाकिस्तान धुमसतोय; पीटीआय आणि टीटीएपीची देशव्यापी निदर्शने

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

अल-फलाह विद्यापीठाभोवतीच्या तपासात अलिकडच्या काळात एका माजी विद्यार्थ्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, उमर नबी हा अल-फलाहशी संबंधित पहिला व्यक्ती नाही जो दहशतवादाशी जोडला गेला आहे. अल-फलाहमधील एका माजी विद्यार्थ्याला यापूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. इंडियन मुजाहिदीनच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेल्या मिर्झा शादाब बेगचे नाव समोर आले. बेगने २००७ मध्ये फरिदाबादमधील अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले. एका वर्षानंतर, तो २००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे आढळून आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा