28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामासाकीनाक्यात 'निर्भया'च्या पुनरावृत्तीने खळबळ

साकीनाक्यात ‘निर्भया’च्या पुनरावृत्तीने खळबळ

Related

पश्चिम उपनगरातील साकिनाका येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ३० वर्षीय विवाहितेवर उभ्या असलेल्या टेम्पोत बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड सारखी वस्तू टाकून या विवाहितेचा गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता साकिनाका परिसरात घडली.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी ४५ वर्षीय इसमाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बलात्कार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत आणखी आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पीडित विवाहिता अद्याप जबाब देण्याच्या स्थितीत नसल्यामुळे तिचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही.

या खळबळजनक घटनेनंतर डीसीपी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मोहन चौहान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ३०७, ३७६, ३२३, ५०४ या कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

प्रकल्पाच्या माहितीवर पालिकेची मगर’मिठी’

‘काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’

गुणवत्ता आणि प्रतिभेला सामावून घेण्यासाठी उद्योगांत स्पर्धा

साकिनाका विभागातील खैरानी मार्गावर ही महिला जखमी अवस्थेत पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास आढळली. तेव्हा साकिनाका पोलिस ठाण्यातून १० मिनिटांत पोलिस तिथे पोहोचले. त्यानंतर तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची यानिमित्ताने पुन्हा आठवण ताजी झाली आहे. त्या घटनेतही एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि तिच्यावर असेच अत्याचार करण्यात आले होते. त्यात ती तरुणी रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर मृत्युमुखी पडली होती. त्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,020सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा