30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामाभुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

Google News Follow

Related

शहर फिरवून आणण्यासाठी नातेवाइकांना गाडीतून नेणाऱ्या २३ वर्षीय महिला इंजिनीअरचा भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना बेंगळुरूत रविवारी घडली.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील प्रगतीनगरमध्ये राहणारी भानू रेखा ही इन्फोसिस कंपनीत काम करते. तिने रविवारी नातेवाइकांना बंगळुरू शहर फिरवण्यासाठी महिंद्रा झायलो ही गाडी दिवसभरासाठी भाड्याने घेतली होती. त्यात ती मिळून सहा प्रवासी होते. मात्र बेंगळुरू शहरात दुपारी तब्बल ३५ ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे बेंगळूरूच्या केआर सर्कल भुयारी मार्गामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे ही गाडी अडकली आणि गाडीत पाणी शिरू लागले. गाडीतून सर्वांना बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर काढेपर्यंत केबिनमध्ये पाणी शिरले होते आणि जवळजवळ छतापर्यंत पोहोचले होते. महिलेला तिच्या नातेवाइकांसह नृपतुंगा रोडवरील जवळच्या सेंट मार्था हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.

पोलिसांनी चालक हरीशच्या हवाल्याने सांगितले की, तो विधान सौधा (विधानसभा) बाजूकडून गाडी चालवत असताना त्याने त्याच्या पुढे भुयारी मार्गातून दोन ऑटोरिक्षा जाताना पाहिल्या. “मला वाटले, माझी गाडी सहज जाऊ शकेल, पण आम्ही अडकलो आणि पाण्याची पातळी लगेचच वाढली. दरवाजे उघडत नव्हते. बचाव पथक आणि काही स्वयंसेवक येईपर्यंत आम्ही बाहेर पडू शकलो नाही, अशी माहिती चालकाने दिली.

दुपारी चारच्या सुमारास, बचाव पथकाने कारवाई केली आणि वाहनातून सहा जणांची सुटका केली. भानू रेखा यांना बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांची आई स्वरूपा (४६) आणि नातेवाईक सम्राज्यम (६५), शमिता (१३), शोविता (१५) आणि संदीप (२५) हे बचावले.

हे ही वाचा:

पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला

ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!

कोल्हापुरातील खाशाबा जाधवांचा विजय स्तंभ झाला ‘पराभूत’

दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म, ओळखपत्राची गरज नाही

घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट देणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपचारात उशीर झाल्याच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे सांगितले. तसेच, रेखाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. तर, भानू रेखा हॉस्पिटलमध्ये आली, तेव्हाच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या आपत्कालीन डॉक्टरांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा