कर्नाटकमधील हंपी येथे एक २७ वर्षीय इस्रायली पर्यटक आणि २९ वर्षीय होमस्टे मालकीण या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याशिवाय या महिलांसोबत असलेल्या तीन पुरुष साथीदारांवरही नराधमांनी हल्ला केल्याची माहिती आहे. या तीनही पुरुषांना त्यांनी कालव्यात ढकलून दिले. यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान सानापूर तलावाजवळ घडली. हंपीपासून सुमारे ४ किमी अंतरावर ही जागा आहे. हंपी हे कर्नाटकातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असून देश- विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास, दोन महिला आणि तीन पुरुष, हे हंपी आणि जवळपासच्या इतर ठिकाणी गप्पा मारत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. यावेळी मोटारसायकलवरून तीन तरुण त्यांच्याकडे आले आणि त्यांनी या गटाकडे पेट्रोल मागितले आणि सांगितले की त्यांच्याकडे पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना २० रुपये देऊ केले असता बाईकवरील पुरुषांनी १०० रुपये मागितले. यातून वाद झाला आणि हाणामारीही झाली. हल्लेखोरांनी पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलले. त्यानंतर, ते पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, तीनपैकी दोघांनी तिच्यावर आणि इस्रायली पर्यटकावर बलात्कार केला.
हेही वाचा..
फेब्रुवारीत २२० कोटींहून अधिक आधार ऑथेंटिकेशन व्यवहार
भारताकडून अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती; ट्रम्प यांचा दावा
महिला दिनानिमित्त सीएसएमटी- साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे सारथ्य महिलांच्या हाती
बुद्धिबळ ग्रँडमास्टर वैशालीकडे पंतप्रधानांच्या ‘एक्स’ हँडलची जबाबदारी
कालव्यात पडलेल्या तिघांपैकी डॅनियल आणि पंकज बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु ओडिशाचा डेबॉस बाहेर पडू शकला नाही. त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. पुढे त्यांनी पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. स्थानिक असल्याचे मानले जाणारे तिघेही पुरुष मोटारसायकलवरून आले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम ३०९ (६) (खंडणीची चोरी), ३११ (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने दरोडा), ७० (१) (सामूहिक बलात्कार) आणि १०९ (खून करण्याचा प्रयत्न) यांचा समावेश आहे.







