26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाआईची हत्या करून युवकाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

आईची हत्या करून युवकाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

Related

आईची हत्या करून मुलाने रेल्वे खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंड पश्चिम येथील वर्धमान नगर येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

जखमी मुलाला उपचारासाठी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छाया पांचाळ (५०) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव असून जयदीप पांचाळ (२२) याने आत्महत्याचा प्रयत्न केला.

मुलुंड पश्चिम येथे एका फ्लॅटमधून रक्त येत असल्याची खबर पोलिसांना लागली. पोलिसांच्या मोबाईल १ वाहनावरील पथकास हा संदेश मिळाला. ती माहिती मिळताच पोलिसांनी त्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.  याबाबत पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोथिंबीरे यांना कळविले. ते स्वतः इथे आल्यानंतर त्यांना साधारपणे वय वर्षे ४६ असलेल्या एका महिलेचा गळा चिरून मारल्याचे आढळले.

सदर प्रकार हा हत्येचा असल्याने शेजारच्या लोकांना त्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्या महिलेच्या पतीचा संपर्क क्रमांक मिळविण्यात आला. त्याच्याशी संपर्क केल्यावर मुलाचा रेल्वे अपघात झाला असून तो मुलुंड येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. पण पोलिसांना त्यात संशयास्पद वाटले. म्हणून त्यांनी घराची पाहणी केली. त्यात घराच्या ह़ॉलमध्ये गुजराती भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली. तसेच बाथरुममध्ये एक चाकू पडल्याचे दिसले. या मयत महिलेच्या पतीला घरी बोलावून त्याला चिठ्ठी दाखविण्यात आली. तेव्हा हे अक्षर मुलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मुलगा आणि पत्नी हे वडिलोपार्जित संपत्तीवरून तणावात असल्याचे पतीने सांगितले. या महिलेची हत्या २२ वर्षीय मुलाने केल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

दीव पालिका निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

वंदे मातरम घोषणा देत तरुणाची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

माशाचे अश्रू, राजेश खन्ना आणि अमिताभ…

एनबीसीसीचे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या घरातून दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

 

या घटनास्थळाला नंतर अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उपायुक्त परिमंडळ ७, सहाय्यक पोलिस आयुक्त मुलुंड यांनी भेट दिली आणि तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. या घटनेसंदर्भात आता ३०२, २०१ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तसाप पोलिस निरीक्षक दायमा करत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा