26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाविक्रोळी - कांजूरमार्ग परिसरात रिक्षावाल्याने तरुणाला लुटले!

विक्रोळी – कांजूरमार्ग परिसरात रिक्षावाल्याने तरुणाला लुटले!

Related

कोरोनाच्या मोठ्या काळानंतर मुंबई पूर्वपदावर येत आहे. पण त्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी पीडित तरुण विक्रोळी लालबहादूर शास्त्री मार्गावरून पायी चालत जात असताना रिक्षा चालकाने पीडित तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून विक्रोळी पार्कसाईट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांचा तिसरा साथीदार रिक्षाचालक फरार असून पोलीस शोध घेत आहे.

पीडित तरुण ५ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी लालबहादूर शास्त्री मार्गावरून जात असताना रिक्षा चालकाने सूर्यनगर जाणार का ? म्हणून विचारले. पीडित तरुणाने होकार देताच रिक्षामध्ये बसला. रिक्षात अगोदरच दोघे जण बसलेले होते. रिक्षा काही अंतर पुढे गेली असता दोघांनी जबरदस्ती करुन पीडित तरुणाच्या खिशातून १० हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि कानातली सोन्याची रिंग सुद्धा काढून घेतली. पीडित तरुणाला सूर्यनगर येथे न सोडता कांजूरमार्ग येथील हुमाटॉकीज परिसरात सोडण्यात आले व चोरांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित तरुणाने विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

अपघातग्रस्त कुटुंब म्हणाले, एकनाथजींच्या रूपात विठ्ठल आला!

अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!

अमरनाथ यात्रेत ३ दिवसात ६ जणांचा मृत्यू

आगकाडी पेटविली आणि डोंबिवलीत झाला गॅस सिलिंडरचा स्फोट

 

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास यंत्रणेला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे, नितीन कदम ह्यांच्या चमूने आरोपीचा शोध घेतला. रस्त्यांवरील सीसीटीव्ही च्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पावसामुळे रिक्षाची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नव्हती. तरी देखील तांत्रिक तपास व खबऱ्यांना कामाला लावून आरोपीची माहिती मिळवली. सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. रिक्षामधील प्रवाशांची लूटमार करतात अशी माहिती पोलिसांनी दिली. ह्या गुन्ह्यातील आरोपी हे कल्याण येथील बनेली येथे राहणारे आहेत. त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले असून, तिसरा साथीदार रिक्षा चालक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा