29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरधर्म संस्कृतीद्युत प्रतिपदा, पाडवा... साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त!

द्युत प्रतिपदा, पाडवा… साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त!

Google News Follow

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

सुवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला ‘द्युत प्रतिपदा’ असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, प्रजाहितदक्ष राजा अशी बळीराजाची ओळख होती‌. दानशूर राजा म्हणूनही बळीराजाची वेगळी ओळख होती. बळीराजाने एक यज्ञ केला होता आणि यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती.

भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने बळीराजाकडे दानामध्ये तीन पावले जमीन मागितली. बळीराजानेही हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. मात्र, तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने आणि वचनपूर्तीसाठी बळीराजाने स्वतःचे मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील.

हे ही वाचा:

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

आदित्यजी बघा, करंज्यात १०० हून अधिक खारफुटीची झाली कत्तल!

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक नव्या वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा