जामिया मिलियाचे कुलगुरू आसिफ म्हणाले, सर्व भारतीयांचा डीएनए महादेवांचा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावरून झाला होता वाद

जामिया मिलियाचे कुलगुरू आसिफ म्हणाले, सर्व भारतीयांचा डीएनए महादेवांचा!

जामिया मिलिया विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, पण हा कार्यक्रम अखेर झाला. या कार्यक्रमात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मझर आसिफ यांनी केलेले विधान चांगलेच गाजले आहे.

ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “सर्व भारतीयांचा डीएनए हे महादेवाचा डीएनए आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

आपल्या भाषणात असिफ यांनी भारतातील विविधतेबद्दल बोलताना सांगितले की, लोक वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीतून येतात, पण तरीही ते भारतीय म्हणून एकत्र राहतात. त्यांनी म्हटले की, ही एकता म्हणजेच महादेवांचा डीएनए आपल्यामध्ये वाहतो आहे.

ते पुढे म्हणाले की, सनातन संस्कृती ही सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणारी व्यवस्था आहे. महादेवांच्या कुटुंबाच्या उदाहरणातून त्यांनी वेगवेगळ्या जीवांचे एकत्र राहणे स्पष्ट केले.

हे ही वाचा:

विमान भाड्यात वाढ झाल्याने हज यात्रेकरुंचा खर्च वाढला

पाकिस्तानातील ख्रिस्ती समुदाय भीतीच्या छायेखाली

बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधान परिषद उमेदवारीचीही घोषणा

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची शक्यता

कार्यक्रमावरून वाद

हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केला होता आणि पण काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) यांनी या कार्यक्रमाविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून कॅम्पसबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमादरम्यान कुलगुरूंचे आरएसएसतर्फे स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

दरम्यान, आंदोलन करणारे विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमले आणि या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. एआयएसए दिल्ली अध्यक्ष आणि जामिया विद्यार्थी सैयद (कॉम्रेड सैयद) यांनी विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

कुलगुरूंच्या वक्तव्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. काहींनी त्यांच्या एकतेबद्दलच्या विचारांना समर्थन दिले, तर काहींनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि केंद्रीय विद्यापीठात त्याचे आयोजन यावर प्रश्न उपस्थित केले.

Exit mobile version