31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरधर्म संस्कृतीकेदार धाम मंदिराचे दार या तारखेला उघडणार

केदार धाम मंदिराचे दार या तारखेला उघडणार

Google News Follow

चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. हिवाळा संपल्यानंतर चारधाम मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातात. आता हे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाली आहे. चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे यावर्षी २५ एप्रिल रोजी उघडणार आहेत. केदारनाथ मंदिर समितीने ही माहिती दिली आहे.

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती, पाचगाई हाक-हाकुकधारी यांच्यासह केदारनाथ तीर्थ पुरोहित समाज आणि भाविकांच्या उपस्थितीत श्री ओंकारेश्वर मंदिर उखीमठ येथे शिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केदारनाथ धामचे दरवाजे निश्चित करण्यात आले आहे.

केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडपासून सुमारे १६ किमी आहे. केदारनाथ मंदिर २५ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर २७ एप्रिल रोजी सकाळी ७.१० वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडले जातात. यावेळी २२एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे आणि उत्तराखंडच्या चार धामांपैकी तिसरे आहे. असे मानले जाते की येथे भगवान शिव पांडवांना बैलाच्या रूपात प्रकट झाले होते. आदिगुरू शंकराचार्यांनी हे मंदिर बांधले होते. केदारनाथ हे ३,५८१ चौरस मीटर उंचीवर आहे.बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची चार धाम मंदिरे हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड थंडीमुळे भाविकांसाठी बंद असतात. दरवर्षी उन्हाळ्यात या चारही मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात आणि हिवाळा सुरू होईपर्यंत खुले असतात.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा