28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामाप्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर

प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर

दामिनी पथकाने तरुणीला मनोविकार तज्ज्ञांकडे केले दाखल

Google News Follow

Related

औरंगाबाद येथील पुंडलिक नगर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका तरुणीने तिच्याबरोबर तिच्या  प्रियकराने बोलणे बंद केल्याचा दोष आपल्या आईला देत जन्मदात्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.   याबाबत सविस्तर वृत्त असे की, १७ वर्षीय मुलगी आपल्या  आई ,वडील, भाऊ आणि लहान बहिणीसोबत राहत होती. संबंधित मुलगी अभ्यासात हुशार असल्यामुळे दहावीला कोणताही क्लास न लावता चांगल्या मार्काने पास होऊन तिला स्कॉलरशिप पण मिळाली होती, चांगल्या मार्कांमुळे ती विज्ञान शाखेत चांगल्या महाविद्यालयात शिकत होती. त्यासोबतच ती वसतिगृहात राहत होती. त्याचवेळी तिची एका मुलासोबत मैत्री होऊन ती त्याच्या प्रेमात पडली अशी माहिती ‘दामिनी पथकाकडून’ मिळाली आहे.

तिच्या या प्रेमकहाणीची कुणकुण तिच्या घरी आईवडिलांना लागली. त्यांनी तिला शिक्षणावर लक्ष देण्यास सांगितले. आणि तेव्हाच तिच्या प्रेमाला विरोध केला. त्यामुळेच तिच्या त्याच मित्राने तिच्याशी बोलणे बंद केले. याचाच राग मनात ठेऊन ती हॉस्टेल सोडून पंधरा दिवसांपूर्वीच घरी परतली. घरी आल्यावर तिची होणारी चिडचिड बघून तिच्या आईने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पाचच दिवसांपूर्वी तिने आईवर हात उगारला होता त्यातच तिच्या  प्रियकराने  तिला गुरुवारी आता मला फोन करू नकोस असे सांगितले ,त्यावर चिडलेल्या त्या मुलीने आईला खाली पाडून तिचा गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे तिच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच दामिनी पथकाने या तरुणीला त्वरित मनोविकार तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

 

दामिनी पथक घटनास्थळी दाखल

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दामिनी पथक दाखल झाले. मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. मुलीला सुद्धा बोलावून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलीवर योग्य उपचार करण्यासाठी डॉ. काद्री यांना संपर्क साधून तिच्यावर योग्य उपचार करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी तिला इस्पितळात दाखलही करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा