28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणशिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

नाव हरवले तर ते पुन्हा येत नाही

Google News Follow

Related

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांचेच आहे हा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप शेअर करत एकप्रकारे आपले मत व्यक्त केले आहे.मागे एका सभेत त्यांनी वारसा हा विचारांचा असतो असे भाष्य करत उद्धव ठाकरे यांना वास्तवाचे भान आणून दिले होते.

राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये जो व्हीडिओ शेअर केला आहे त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, नाव आणि पैसा पैसा येतो पैसा जातो, पुन्हा येतो नाव गेलं की येत नाही. ते गेलं की, पुन्हा येत नाही काळ्या बाजारातही मिळत नाही. म्हणून नाव मोठं करा त्याला जपा.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची!! धनुष्यबाण चिन्हही शिंदेकडे!

राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

राऊत म्हणाले, कुणीतरी शिंदे येऊन पक्ष घेऊन जातात…

संजय राऊत त्याला काही निकाल म्हणत नाहीत. निकालात सत्य असत्याचा विचार केला जातो. निकालात न्याय संविधान घटनेचा विचार केला जातो. बाळासाहेब ठआकरेंची शिवसेना कुणीतरी शिंदे येतात ४० बाजारबुणग्यांना घएऊन दावा करतात. लुटालूट, चोऱ्यामाऱ्या करता निवडणूक आयोग खरे आहे म्हणते यावर विश्वास कोण ठेवणार. चोरांचे सरदार बसलेले आहे. राज्य आणि पक्ष ताब्यात घ्यायला सुरुवात केली तर देशच राहणार नाही.

शिंदेंनी दिले वचन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत. त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा