25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारण'देशातील लोकशाही संपली, लोकशाहीला आदरांजली वाहिली आहे का?'

‘देशातील लोकशाही संपली, लोकशाहीला आदरांजली वाहिली आहे का?’

उद्धव ठाकरे यांनी केली टीका

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने देण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरच निशाणा साधला.

ते म्हणाले की, आज जो निकाल दिला आहे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. दुर्दैवाने आपल्या देशाच्या अमृतमहोत्सव सुरू असताना लाल किल्ल्यावरून घोषणा करावी ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे, आणि बेबंदशाहीला सुरुवात केली आहे. अनेक उदाहरणे आहेत सरकारची दादागिरी आहे. देशातील लोकशाही संपली. लोकशाहीला आदरांजली वाहायची का आता?

उद्धव ठाकरे म्हणाले की, हा निर्णय अनपेक्षित आहे. सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे. २१ तारखेपासून सुनावणी सुरू होईल. तो निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने देऊ नये. असे म्हणणे मांडले होते. पक्ष कुणाच्या बरोबर आहे लोकप्रतिनिधींवर ठरवू लागलो तर कुणीही धनाढ्य माणूस विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. दयनीय अवस्था आमच्या गद्दारांची झाली आहे. त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाही. निवडणूका घ्या असे आव्हान दिले आहे. निवडणूक घेण्याची हिंमत नाही. चिन्ह व नाव दिले आहे एका महिन्यात निवडणुका जाहीर होतील. कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायची आहे भिकेचा कटोरा द्यायचा आहे. ते स्वप्न प्रत्येक धनुष्यबाण देऊ साकारयाचे आहे. उद्या मशाल चिन्हही ते घेतील पण मशाल पेटलेली आहे.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

 

उद्धव ठाकरेंनी दाखवला बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवून पूजत होते, तो उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना दाखविला. ते म्हणाले की, अनेकांना वाटले असेल की शिवसेना संपली ही लेचीपेची नाही. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण ही शक्ती यांना दाखविल्याशिवाय राहणार नाही. पूजेतला धनुष्यबाण आहे तिथेच तो राहील. रावणाकडेही असेल रामाकडेही असेल रामाचा विजय झाला १०० कौरव आले म्हणून पांडव हरले नाहीत सत्याचा विजय होईल. अन्याय झाला तो लोकशाहीवर होतो आहे. आपली चोरी पचली म्हणून आनंद झाला असेल. नामर्दच अशी चोरी करू शकेल. हे सत्य आहे. लवकरच आम्ही न्यायालयात जाऊ चोरण्याचा आनंद त्यांना मिळू द्या चोरबाजाराला मान्यता मिळणार अल शिवसैनिकांनो खचू नको. लढाई शेवटपर्यंत लढावी लागेल. हिंमत सोडू नका. जिद्द ठेवा. विजयाशिवाय मागे हटायचे नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा