29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरसंपादकीयसूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना नामोहरम करण्यासाठी नवा फंडा

Google News Follow

Related

२०२४ ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते आहे, तशी भारतीय राजकारणातील शह-काटशहांना जोर येत चालला आहे. हे अपेक्षितपण होते. काही आंतरराष्ट्रीय कलाकार या राजकीय नाट्यात सामील झाले आहेत. हंगेरीअन अमेरीकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक सेक्युरीटी कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हुकूमशहा असा उल्लेख करत त्यांच्याविरोधात उघड उघड दंड थोपटले आहेत.

मोदींना रोखण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत अनेक प्रयोग राबवण्यात आले. प्रत्येक प्रयोग फसल्यानंतर आणखी मोठे कांड करून त्यांना दणका देण्याचा प्रयत्न झाला. सर्व थकल्यावर असे काही करण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे देशाला हादरा बसेल. परंतु यावेळी याची सूत्र आंतरराष्ट्रीय सूत्रधारांनी हाती घेतली होती. अदाणी प्रकरणामुळे मोदींची भारतावर असलेली पकड ढिली होऊन भारतात लोकतांत्रिक बदल होऊ शकतो, असा आशावाद सोरोस यांनी व्यक्त केला आहे. सोरोस बराच काळ ही अपेक्षा बाळगून आहेत, परंतु पोटातले ओठावर पहिल्यांदा आले आहे.

ओपन सोसायटी फाऊंडेशन ही जॉर्ज सोरोसची एनजीओ २०१६ सालपासून ही एनजीओ भारत सरकारच्या वॉचलिस्टवर आहे. ही संस्था भारतातील अनेकांसाठी दुभती गाय आहे. याच संस्थेच्या माध्यमातून जॉर्ज सोरोस हे जागतिक मीडिया, एनजीओंना रसद पुरवत असतात. अनेक राजकीय नेते, कथित विचारवंत, अर्थतज्ज्ञ, पत्रकार भारतात मोदी काळामध्ये जी गाजलेली आंदोलने झाली, त्यात अवॉर्ड वापसी, शाहीनबाग, शेतकरी आंदोलन, या सर्व आंदोलनात सामील असलेल्या संस्थांचा कुठेना कुठे सोरोस यांच्याशी संबंध आहे.

इंटरनॅशनल कमिटी ऑफ इन्वेस्टीगेटीव्ह जर्नलिस्ट या संस्थेमार्फत भारतविरोधी किंवा केंद्र सरकारविरोधी प्रोपगंडा करणाऱ्या पत्रकारांना पैसा पुरवला जातो. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नमती या एनजीओच्या सल्लागार मंडळावर सोरोस यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आहेत. गांधी-वाड्रा परीवाराशी घनिष्ट संबंध असलेले हर्ष मंदर हे ओपन सोसायटी फाऊंडेशनशी संबंधित आहेत. अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव अशा अनेकांचे सोरोस यांच्या संस्थेशी प्रत्यक्ष वा परोक्ष संबंध आहेत.   लॉयर्स कलेक्टीव्ह, सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च, मल्टीपल एक्शन रिसर्च गृप या संस्थांना सोरोसचा पैसा मिळतो. अमेरिकेतील मीडिया रिसर्च सेंटरने केलेल्या एका सर्व्हेमध्ये सोरोसचे संबंध अमेरिकेतील ३० बड्या मीडिया हाऊसेसशी असल्याचे उघड झाले. सतत भारतविरोधी बातम्या आणि लेखांचे प्रसारण करणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, हफींग्टन पोस्ट आदींचा याच समावेश आहे.

भारतातील अदाणी समुहाच्याविरोधात हिंडेनबर्ग शॉर्ट सेल एण्ड रिसर्च फर्मच्या अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर हा भारताच्या अर्थकारणाला धक्का लावण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अनेकांनी केला. अदाणी हे दूध के धूले नाहीत, परंतु तसे कोणताही उद्योजक नसतोच. परंतु त्यांचे आंतरराष्ट्रीय उद्योग प्रकल्प, शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी अल्पकाळात घेतलेली भरारी अनेकांना खूपत होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात काही मोठे कांड होणार हे नक्कीच होते. मोदींवर गोळी झाडण्यासाठी अदाणींचा खांदाही सोयीचा होता. कारण दोघेही गुजराती होते.

सोरोस यांनी त्यांच्या भाषणात मोदी आणि अदाणी यांचे संबंध आहेत, हिंडेंनबर्ग अहवालात उपस्थित केलेल्या प्रश्नाचे मोदींनी उत्तर द्यायला हवे, असे म्हटलेले आहे. सोरोस हे उद्योगपती आहेत. त्यांना खरे तर दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याची गरज नाही. परंतु त्यांनी मोदींचा उल्लेख हुकूमशहा असा केला. कारण नसताना २००२ च्या गुजरात दंगलींशी त्यांना जोडले. भारतातील लिबरल, डावे आणि पुरोगामी जसे गुजरात दंगलींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली क्लीनचीट मानत नाहीत, तेच सोरोस यांनीही केले आहे. त्यांनी एक प्रकारे भारतीय न्यायव्यवस्थेचाही अपमान केला आहे.

अदाणी प्रकरणामुळे मोदींची पकड ढिली झाली असून त्यामुळे देशात संस्थांत्मक परिवर्तन होऊ शकते, लोकशाहीचे नवनिर्माण होऊ शकते, हा सोरोस यांचा दावा म्हणजे उघडपणे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे. जागतिक आर्थिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर आला. गेल्या नऊ वर्षांत भारताने घेतलेली भरारी जगातील अनेक देशांना अचंबित करणारी आहे. मोदींना विकत घेता येत नाही आणि वाकवता येत नाही, त्यामुळे सत्तेवर आल्यापासून त्यांच्याविरोधीत षडयंत्राची मालिका रचण्यात आली. या कारस्थानातील प्याद्यांना जी व्यक्ति रसद पुरवत होती ती आता दंड थोपटत उघडपणे समोर आली आहे.

हे ही वाचा:

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची!! धनुष्यबाण चिन्हही शिंदेकडे!

भारतातील हे आहे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, काय आहे दिल्ली-मुंबईची स्थिती

वेळकाढूपणा हवा म्हणून मोठ्या खंडपीठाची मागणी

सोरोस यांच्या भाषणात ज्या देशांवर टीका करण्यात आली आहे, त्यात रशिया, चीन, तुर्कीये आणि भारताचा समावेश आहे. भारतातील अनेक आंदोलनामागे सोरोस यांचा हात आहे, असे मानले जाते. अनेकांशी सोरोस यांचे असलेले आर्थिक लागेबांध उघडही झाले आहेत. परंतु सोरोस यांचा बोलवता धनी कोण ही बाब मात्र अनुत्तरीत आहे. भारताच्या प्रगतीमुळे बुडाला आग लागलेले देश हे करतायत असे मानायला वाव आहे.

सोरोस यांच्या भडकावू वक्तव्यानंतर भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. सोरोस यांना आपले व्यावसायिक हीत जपणारी सरकार हवे असते. त्यांच्या पपलूंचे सरकार. त्यासाठी त्यांनी एक अब्ज डॉलर्सचा निधी खर्च करण्याची घोषणा केली आहे. सोरोस यांनी भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कमजोर करण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पपलूंनी हे नीट समजून घ्यावं कि भारताने अशा अनेक आक्रमणांना यापूर्वी पराभूत केले आहे.

स्मृती ईराणी यांनी सोरोस यांच्या पपलूंचा उल्लेख जाणीव पूर्वक केला आहे. भाजपाने या पत्रकार परिषदेसाठी स्मृती ईराणी यांची निवडही जाणीवपूर्वक केली आहे. स्मृती यांनी राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूत केले. हेच राहुल गांधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदाणी-मोदी संबंधांवर बोलले. जो राग राहुल यांनी आलापला तोच राग सोरोस आलापतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा