33 C
Mumbai
Friday, April 24, 2026
घरधर्म संस्कृतीश्री माता वैष्णोदेवी देवस्थान सीईओ वैश्य यांना बूट काढायला सांगितल्यावर वैतागले

श्री माता वैष्णोदेवी देवस्थान सीईओ वैश्य यांना बूट काढायला सांगितल्यावर वैतागले

Google News Follow

Related

श्री माता वैष्णोदेवी देवस्थान बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिनकुमार वैश्य वेगळ्याच कारणासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ते माता वैष्णो देवीशी संबंधित एका संस्थेच्या उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी पूजा सुरू होती आणि पंडित मंत्रोच्चार करत होते. उद्घाटनापूर्वी पंडितांनी त्यांना जोडे काढण्यास सांगितले. यावर सचिन कुमार वैश्य नाराज झाले आणि “मला जोडे काढावे लागतात… म्हणूनच मी अशा कार्यक्रमांना येत नाही,” असे म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे उपस्थित लोक अचंबित झाले.

या व्हीडिओत सदर अधिकारी उद्घाटनस्थळी येताना दिसतात. ते निळ्या रंगाच्या शर्टमध्ये आहेत. त्याचवेळी त्यांना उद्घाटनासाठी फित कापण्यापूर्वी बूट काढण्याची विनंती केली जाते तेव्हा ते वैतागल्याचे दिसते.

हे ही वाचा:

तैवानमधील निवडणुकांत चीन करणार सायबर हल्ले

लाच घेताना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरेला रंगेहाथ अटक

अमेरिका-इराण संघर्षात तात्पुरता संघर्षविराम; भारताने दिला शांततेचा संदेश

भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता… खर्गेंची माफी

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची लाट उसळली आहे. अनेकांनी त्यांना सीईओ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या वर्तनाला अहंकारी असे संबोधले, तर काहींनी धार्मिक परंपरांचा अनादर केल्याचा आरोप केला.

काही प्रतिक्रिया देणाऱ्यांनी असेही म्हटले की, जी व्यक्ती माता वैष्णो देवीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो, त्याने त्या ठिकाणच्या परंपरा आणि श्रद्धेचा आदर करणे आवश्यक आहे.

भाजपाच्या युवा मोर्चाचे नेते तांडव सिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा मानसिकतेच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी आणि त्या पदावर श्रद्धा व परंपरांचा आदर करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी. सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावर आणि सार्वजनिक स्तरावर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाकडून पुढील कारवाईबाबत उत्सुकता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा