33 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026
घरधर्म संस्कृतीनाझीया इलाही घुसल्या लेन्सकार्टच्या शोरूममध्ये आणि...

नाझीया इलाही घुसल्या लेन्सकार्टच्या शोरूममध्ये आणि…

हिंदूंच्या प्रतिकाना विरोध केल्याचा होता आरोप

Google News Follow

Related

चष्म्याचे प्रसिद्ध विक्रेते लेनस्कार्ट ही कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  कंपनीने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बिंदी आणि टिळा लावण्यास मनाई केली पण हिजाबला परवानगी दिल्याच्या आरोपांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, एका मुस्लिम भाजप नेत्या नाझीया इलाही यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांच्या सदस्यांनी मुंबईतील एका शोरूममध्ये घुसून कर्मचाऱ्यांच्या कपाळावर टिळा लावला, त्यांच्या हातात पवित्र दोरा बांधला आणि घोषणा दिल्या.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्या नाझीया इलाही यांनी इतरांसह लेंसकार्टच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना सामोरे जात “जय श्री राम”च्या घोषणा दिल्या. या संवादादरम्यान, त्यांनी फ्लोअर मॅनेजर मोहसिन खान यांना हिंदू प्रतीकांवरील कथित निर्बंधांबाबत प्रश्न विचारले.

एका व्हिडिओमध्ये त्या विचारताना ऐकू येतात, “म्हणूनच टिळा बंद केला का? कारण तुम्ही मोहसिन खान आहात?” दुकानाबाहेर बोलताना त्यांनी व्यवस्थापनावर एका धर्माला प्राधान्य देण्याचा आरोप केला. “हे हिंदू राष्ट्र आहे. लेंसकार्टने माफी मागितली नाही तर कंपनीचा बहिष्कार केला जाईल किंवा तिची सर्व दुकाने बंद केली जातील,” असे त्या म्हणाल्या.

परिस्थिती आणखी चिघळली जेव्हा खान यांनी हिंदू कर्मचाऱ्यांना पुढे बोलावून त्यांच्या कपाळावर टिळा लावला आणि धार्मिक ओळख व्यक्त करण्यात लाज वाटू नये असे सांगितले.

दरम्यान, शोरूममधील एका कर्मचाऱ्याने दावा केला की कंपनीच्या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना टिळा आणि मनगटात दोरा घालण्यास मनाई असल्याचे सांगितले गेले होते. त्याने पुढे असा आरोप केला की विवाहित महिला कर्मचाऱ्यांनाही मंगळसूत्र घालण्यास परवानगी नव्हती.

या दाव्यांमुळे उपस्थितांमध्ये संताप पसरला आणि शोरूम मॅनेजरकडून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली. हिंदू कार्यकर्त्यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत शोरूम तात्काळ बंद करण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, कंपनीच्या अंतर्गत दस्तऐवजामध्ये हिजाबला परवानगी देत बिंदी आणि टिळ्यासारख्या धार्मिक चिन्हांवर निर्बंध असल्याच्या आरोपांमुळे लेंसकार्ट वादाच्या केंद्रस्थानी आली.

हे ही वाचा:

दबावाखाली चर्चा करणार नाही!

जर्मनीतील गुरुद्वारात संघर्ष; शस्त्रांसह ४० जण भिडले

भारत- रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरणार; काय आहे RELOS करार?

६५ जागा ठरवणार पश्चिम बंगालचे भवितव्य

वाद वाढल्यानंतर कंपनीने माफी मागितली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष बन्सल यांनी स्पष्ट केले की संबंधित धोरण दस्तऐवज “अचूक नाही” आणि तो सध्याच्या कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी सांगितले की व्हायरल झालेला दस्तऐवज हा जुना प्रशिक्षण नोट होता आणि कंपनीच्या मानव संसाधन धोरणाचा भाग नव्हता. तसेच, बिंदी आणि टिळ्याबाबतचे संदर्भ नंतर काढून टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

नंतर कंपनीने सविस्तर इन-स्टोअर स्टाइल मार्गदर्शक जाहीर केला, ज्यामध्ये बिंदी, टिळा, हिजाब आणि पगडी यांसारख्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित प्रतीकांना सर्व आउटलेटमध्ये परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा