28 C
Mumbai
Thursday, August 27, 2026
घरधर्म संस्कृतीमोहनराव भागवतांच्या कार्यक्रमामुळे न्यूयॉर्क महापौर ममदानीना पोटदुखी

मोहनराव भागवतांच्या कार्यक्रमामुळे न्यूयॉर्क महापौर ममदानीना पोटदुखी

मॅडीसन स्क्वेअरला होणार कार्यक्रम

Google News Follow

Related

न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या नियोजित कार्यक्रमामुळे प्रचंड पोटदुखी झाली आहे. या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे म्हटले असून हा खासगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, याबाबत आपण निश्चित नसल्यामुळे हतबल असल्याचे ते म्हणतात.

ममदानी यांची ही प्रतिक्रिया मोहनराव भागवत आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क कार्यक्रमासाठी अमेरिकेत पोहोचल्यानंतर काही तासांनी आली. न्यूयॉर्कमधील त्यांच्या दौऱ्यात भागवत ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात सहभागी होणार असून शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय वंशाच्या सुमारे ५,००० नागरिकांना संबोधित करणार आहेत.

पत्रकार परिषदेत आरएसएस, मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रम आणि त्याविरोधातील आंदोलनांबाबत विचारण्यात आल्यानंतर ममदानी म्हणाले, “मी या रॅलीचे समर्थन करत नाही. मात्र, खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, हे मला माहीत नाही.”

ते पुढे म्हणाले, “मी न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील पहिला भारतीय-अमेरिकन महापौर म्हणूनही येथे उभा आहे आणि माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब अजूनही भारतात राहते.”

हे ही वाचा:

उबाठाची किती ही फरफट?

भारतीयांच्या ताटात ‘हेल्दी’ क्रांती; ‘या’ १० पदार्थांना पसंती

भीक मागायची, माजही दाखवायचा—ऐसा कैसे चलेगा?

गणेशोत्सवाला सावरायला हवं !

ममदानी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाकडून आणि लहानपणापासून त्यांना ज्या भारताची कल्पना शिकायला मिळाली, तो भारत बहुविध समाज आणि प्रत्येक नागरिकाच्या समान सहभागावर विश्वास ठेवणारे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक होता.

ते म्हणाले की, कोणत्याही देशाच्या बहिष्कारी विचारसरणीवर आधारित चळवळीचा उदय चिंताजनक असल्याचे त्यांना वाटते आणि अशा विचारांशी आपण ठामपणे असहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मी केवळ भारतीय-अमेरिकन म्हणूनच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचा रंग, पंथ, धर्म, श्रद्धा किंवा मूळ कोणतेही असले तरी त्या व्यक्तीच्या समान सहभागावर विश्वास ठेवणाऱ्या शहराचा महापौर म्हणूनही अशा विचारसरणीच्या विरोधात आहे,” असे ममदानी यांनी म्हटले.

दरम्यान, अनेक आंतरधर्मीय आणि नागरी हक्क संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलच्या बाहेर पत्रकार परिषद घेऊन मोहनराव भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील उपस्थितीला विरोध केला. या संघटनांमध्ये हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क यांचा समावेश आहे. या संघटनांनी कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

 ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश

मोहनराव भागवत यांच्या उपस्थितीत होणारा ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ कार्यक्रम AHEAD फोरमने आयोजित केला आहे. आयोजकांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या कार्यक्रमाचा संदेश “संपूर्ण जग एक कुटुंब आहे” असा असल्याचे म्हटले आहे.

कृत्रिम भेदभाव आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन मानवतेला जोडणारे बंध ओळखावेत तसेच परस्पर आदर, सौहार्द आणि एकतेची भावना स्वीकारावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मोहनराव भागवत यांचा हा अमेरिका दौरा आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक संपर्क मोहिमेचा भाग आहे. या दौऱ्यात ते कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार असून, न्यूयॉर्कमधील त्यांच्या कार्यक्रमाला समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा