जम्मू-कश्मीर भाजपने श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्समध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. रेशी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या आंदोलनानंतर भाजपने मौन सोडले.
शनिवारी भाजपचे प्रतिनिधीमंडळ, विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन सुधारक कारवाई आणि प्रवेश नियमांचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
प्रवेशावर वाद का?
इन्स्टिट्यूटच्या २०२५–२६ शैक्षणिक वर्षातील पहिल्या एमबीबीएस बॅचसाठी जारी झालेल्या यादीमध्ये ५० पैकी ४२ विद्यार्थी मुस्लिम असल्याचे आढळून आले. याचा हवाला देत अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे की, वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र बोर्डच्या निधीतून चालणाऱ्या संस्थेत हिंदू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले पाहिजे
भाजप नेत्यांची भूमिका
उधमपूरचे भाजप आमदार आर.एस. पाठानिया यांनी एक्सवर लिहिले की, श्री माता वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या श्रद्धा आणि देणग्यांमधून उभारलेल्या संस्थांनी तीर्थक्षेत्राच्या पवित्र मूल्यांशी सुसंगत राहिले पाहिजे. बोर्ड कायदा आणि विद्यापीठ कायद्यांत सुधारणा आवश्यक आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला युवा राजपूत सभा, राष्ट्रीय बजरंग दल आणि मूव्हमेंट कल्की यांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाकडे मोर्चा काढला, गेट जबरदस्ती उघडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवले.
हे ही वाचा:
जी-२० शिखर परिषद: सीमांवर बळाचा वापर अयोग्य; दहशतवादाचा निषेध
हवाई दलाच्या जवानांवर गोळी झाडणारा यासिन मलिकंच!
आयटीबीपीचा ६४ वा स्थापना दिवस उत्साहात
५० पैकी फक्त ७ हिंदू आणि १ शीख बाकी मुस्लिम
राष्ट्रीय बजरंग दलचे अध्यक्ष राकेश बजरंगी म्हणाले, हे मेडिकल कॉलेज हिंदू यात्रेकरूंच्या देणग्यांतून उभारले आहे. पैसा हिंदू समाजाच्या कल्याणासाठीच वापरला जावा.
प्रवेश गुणवत्ता व मेरिटवर
संस्थेने या वर्षी ५० एमबीबीएस जागांची मंजुरी मिळवली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, प्रवेश पूर्णपणे गुणवत्ता आणि मेरिटवर आधारित आहे.
महाविद्यालयाला अल्पसंख्याक दर्जा नाही, त्यामुळे धर्माधारित आरक्षण लागू करता येत नाही.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, जर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तातडीने हस्तक्षेप केला नाही,तर आंदोलन अधिक मोठ्या प्रमाणावर वाढवले जाईल.







