24 C
Mumbai
Friday, January 9, 2026
घरधर्म संस्कृतीदहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाक सेनाधिकाऱ्यांसह सहभागी होता आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज रौफ

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाक सेनाधिकाऱ्यांसह सहभागी होता आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज रौफ

Google News Follow

Related

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर त्यात मृत्युमुखी पडलेल्या अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कारावेळी तिथे असलेला हाफिज अब्दुर रौफ यांच्यावरून सध्या चर्चा रंगली आहे. रौफला अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेले आहे. पण पाकिस्तानने तो दहशतवादी नसून एक सर्वसामान्य नागरीक असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. ही व्यक्ती हाफिज रौफ असल्याचे सांगितले जात होते, पण पाकिस्तान लष्कराने मात्र तो एक स्थानिक धर्मगुरू असल्याचे सांगितले.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक (DG ISPR) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ठामपणे नाकारले की, प्रतिमेत दिसणारा व्यक्ती दहशतवादी आहे. त्याऐवजी, त्यांनी त्या व्यक्तीचे वर्णन धार्मिक नेते आणि “सामान्य कुटुंबातील व्यक्ती” असे केले.

लष्करी प्रवक्त्याने त्या व्यक्तीचा नॅशनल आयडेंटिटी कार्ड (CNIC) देखील सादर केला, ज्यामध्ये त्याचे नाव पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) च्या “वेल्फेअर विंग इंचार्ज” म्हणून नमूद होते.

कोण आहे रौफ?

पाकिस्तानने त्याची गणना धार्मिक नेते म्हणून केली आहे. पण हाफिज अब्दुर रऊफ हा लष्कर-ए-तैयबा (LeT) चा वरिष्ठ नेता आणि आता बंदी घातलेल्या फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (FIF) चा प्रमुख आहे — हे दोन्ही गट अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहेत. पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेले CNIC क्रमांक (35202-5400413-9), नाव आणि जन्मतारीख (२५ मार्च १९७३) हे सर्व तपशील अमेरिका वित्त विभागाच्या निर्बंध यादीशी अचूक जुळतात.

रौफला निरुपद्रवी धर्मगुरू म्हणून सादर करणे हे पाकिस्तानने आपल्या संस्थात्मक पातळीवरील आंतरराष्ट्रीयदृष्ट्या घोषित दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांना नाकारण्याचा किंवा कमी लेखण्याचे आणखी एक उदाहरण आहे. मुरिदके येथे झालेल्या या अंत्यसंस्कारावेळी रऊफच्या मागे पाकिस्तान लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी उभे होते. पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज गुंडाळलेल्या मृतदेहांना लष्करी सन्मान देण्यात आला.

दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी हा व्हायरल फोटो दाखवून पाकिस्तान लष्करी नेतृत्वाची वक्तव्ये व वस्तुस्थितीतला विरोधाभास स्पष्ट केला.

८ मे रोजी मुरिदके येथे झालेला हा अंत्यसंस्कार खाजगी धार्मिक समारंभासारखा नव्हता. फोटो आणि व्हिडिओ फुटेजमध्ये लष्करी प्रोटोकॉल, राज्य सुरक्षा यंत्रणा आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा औपचारिक सहभाग दिसून येतो.

“पाकिस्तानचा दावा आहे की ७ मे रोजी केवळ सामान्य नागरिक मारले गेले. आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की त्या दिवशी सकाळी केलेले सर्व हल्ले फक्त काळजीपूर्वक निवडलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर आणि लक्ष्यांवरच होते,” असे  मिस्री यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. IANS या वृत्तसंस्थेच्या मते, फोटोमध्ये रौफच्या सभोवताल अनेक गणवेशधारी लष्करी अधिकारी दिसतात. त्यात लेफ्टनंट जनरल फैयाज हुसेन शाह (कोर्प्स कमांडर, IV कोर्प्स, लाहोर), मेजर जनरल राव इम्रान सरताज (GOC, ११ इन्फंट्री डिव्हिजन), ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर (कमांडर, १५ हायब्रिड मेकॅनाइज्ड ब्रिगेड), पंजाबचे पोलीस महासंचालक डॉ. उस्मान अन्वर आणि प्रांतिक आमदार मलिक सोहेब अहमद भेर्थ हेही होते.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हाफिज अब्दुर रऊफ आणि अब्दुल रऊफ अझहर (जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ) यांची गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

दहशतवादी इतिहास

रऊफ अझहर (मसूद अझहरचा भाऊ) याचा १९९९ मधील IC-814 अपहरण, २००१ चा भारतीय संसद हल्ला, २०१६ चा पठाणकोट हल्ला आणि २०१९ चा पुलवामा हल्ला यांसारख्या दहशतवादी कट कारस्थानात स्पष्ट सहभाग आहे. याउलट, हाफिज अब्दुर रऊफ हा २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या आर्थिक व प्रचारात्मक कामकाजाचा मुख्य घटक आहे.

हे ही वाचा:

पहलगामनंतर दहशतवाद्यांच्या पापांचा घडा भरला!

भारत-पाकिस्तान संघर्ष: तात्पुरते बंद केलेली ‘ती’ ३२ विमानतळे पुन्हा सुरू!

जोश हेजलवुडची आयपीलएमधून माघार?

केस गळण्यामागची काय आहेत कारणे ?

२००३ मध्येच रौफने LeTशी संलग्न संस्थांची सार्वजनिकरित्या पाठराखण केली होती. पाकिस्तान सरकारने या संघटनेवर औपचारिक बंदी लागू केली होती. पाकिस्तानी माध्यमांतील मुलाखतींमध्ये आणि LeTच्या वेबसाइटवर त्याने दहशतवादी कृत्यांसाठी निधी संकलन व आपत्ती निवारणाचे व्यवस्थापन केल्याचे मान्य केले आहे. अमेरिका म्हणते की, ही कामे केवळ LeTच्या दहशतवादी कारवायांना झाकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षण टाळण्यासाठी होती.

२००९ मध्ये, रौफने FIF च्या नावाने बजौर (पाकिस्तान) येथे निधी संकलन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले, जिथे LeTने मदत व भरती दोन्ही कामे केली.

२४ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिका सरकारने रौफ आणि FIFवर निर्बंध लादले. हे निर्बंध भारतीय गुप्तचर संस्थांनी २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दिलेल्या तपशीलवार फाईल्सवर आधारित होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीने FIF, LeT, तसेच रौफचे निकटवर्ती सहकारी आणि LeTचे संस्थापक हाफिज मुहम्मद सईद यांनाही सूचीबद्ध केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा