28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरधर्म संस्कृतीसिंहस्थ धर्मध्वजात अमृत कुंभापासून दशदिशांपर्यंतच्या परंपरेचे दर्शन

सिंहस्थ धर्मध्वजात अमृत कुंभापासून दशदिशांपर्यंतच्या परंपरेचे दर्शन

त्र्यंबकेश्वरच्या धर्मध्वजाची वैशिष्ट्ये

Google News Follow

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेला धर्मध्वज हा केवळ धार्मिक ध्वज नसून, त्यातून अमृत कुंभाची पौराणिक परंपरा, ज्योतिषीय कालचक्र आणि गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले आहे. या ध्वजावरील प्रत्येक प्रतीकाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, त्यातून सिंहस्थ पर्वाची परंपरा आणि व्यापकता अधोरेखित होते.

धर्मध्वजावर सूर्य, चंद्र आणि बृहस्पती यांची प्रतीके आहेत. अमृत कुंभाच्या रक्षणाशी संबंधित पौराणिक परंपरेचे ते प्रतीक मानले जातात. त्याचबरोबर बृहस्पती आणि सिंह यांचे प्रतीकही ध्वजावर आहे. बृहस्पतीचा सिंह राशीतील प्रवेश हा सिंहस्थ पर्वाच्या कालगणनेचा महत्त्वाचा आधार असल्याने या प्रतीकाला विशेष महत्त्व आहे. ध्वजावर असलेल्या बारा घंटा या बारा राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतीक आहेत. गोदावरी नदीशी संबंधित मगर हे प्रतीकही ध्वजावर दर्शवण्यात आले आहे. याशिवाय ॐकार आणि स्वस्तिक या मंगलचिन्हांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

हवाई दलाचे प्रमुख आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारली सूत्रे

आंध्र प्रदेशातील शाळेत विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला

तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार

सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वज फडकला

धर्मध्वजावरील दशदिशांचे प्रतीकही लक्षवेधी आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ऊर्ध्व आणि अवाच्य अशा दहा दिशांच्या माध्यमातून सिंहस्थ पर्वाची व्यापकता दर्शवण्यात आली आहे. तसेच ‘ह्रीं’ हे बीजाक्षर वैश्विक चेतना, माया आणि सृजनशक्तीचे ध्वनीरूप प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे अमृत कुंभाची पौराणिक परंपरा, बृहस्पतीच्या भ्रमणाशी जोडलेले ज्योतिषीय कालचक्र, गोदावरीची तीर्थपरंपरा आणि दशदिशांची व्यापकता या सर्वांचा संगम त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ धर्मध्वजात पाहायला मिळतो. त्यामुळे या ध्वजातील प्रत्येक चिन्ह सिंहस्थ पर्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्वतंत्र ओळख अधोरेखित करते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा