31 C
Mumbai
Thursday, April 30, 2026
घरसंपादकीयममतांचा थयथयाट, एम फॅक्टर सांगतोय निवडणुकीचा निकाल

ममतांचा थयथयाट, एम फॅक्टर सांगतोय निवडणुकीचा निकाल

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा आज पार पडला. हा टप्पा भाजपासाठी जड मानला जात होता, कारण आज मतदान होत असलेल्या १४२ मतदारसंघांपैकी १२३ जागा जिंकण्यात २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळाले होते. भाजपाच्या वाट्याला फक्त १८ जागा आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात काही ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आहेत. भाजपाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. दहशतीचे प्रयोग सुरू आहेत; तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. लोकशाहीवर बुलडोझर चालवल्याचा भास त्यांना होत आहे. त्यांचा थयथयाट आणि लोकांचा मूड सांगतो आहे की, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ दिसत आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान साधारणपणे पहिल्या टप्प्याप्रमाणेच विक्रमी होण्याची शक्यता आहे. ११ वाजेपर्यंत ४० टक्के, १ वाजेपर्यंत ६१.११ टक्के, तीन वाजेपर्यंत ७८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पाच वाजेपर्यंत हा आकडा ९० टक्के झाला. म्हणजे कल्पना करा किती मतदान होईल याचा. साधारण याच प्रमाणात पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. २०२१ च्या निवडणुकीत प.बंगालमध्ये मतदानाचा टक्का ८२.३० होता. यंदा त्यात सुमारे १० टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांवरही किमान १० टक्के मतदान वाढण्याची स्पष्ट शक्यता दिसत आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढले तरीही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

हे वाढलेले मतदान ममता बॅनर्जी यांच्यासाठी आहे, असा दावा करणे धाडसाचे ठरेल. वाढलेले मतदान हिंदूंचे आहे; ते परिवर्तनासाठी आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. हिंदू धर्म टिकावा, विनाविघ्न दुर्गापूजा करता यावी, रामनवमी साजरी करता यावी, गंगापूजन करता यावे आणि हिंदू म्हणून भयमुक्त जगता यावे, तसेच पश्चिम बंगालमध्ये उद्योग येऊन रोजगार मिळावा म्हणून हे मतदान झाले आहे.

मुस्लिम आणि महिला मतदार हा ममता यांच्या सत्तेचा आधार आहे. या दोन घटकांपैकी महिला मतदार यावेळी तृणमूलपासून फारकत घेऊन भाजपाच्या पारड्यात मत टाकतील, असे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या आणि उत्साह खूपच जास्त दिसत आहे. भयमुक्त वातावरणात महिला मतदान करीत आहेत. शहरात सुद्धा महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या आहेत. कोलकात्यात आज पाऊस पडला, तरी लांबच लांब रांगा लावून महिला मतदान करीत होत्या.

भवानीपूर मतदारसंघातून लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केलेला संताप निवडणुकीचे चित्र स्पष्ट करून जातो. “लोकशाहीवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे; निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत, हे रात्रभर सुरू आहे; निवडणूक निरीक्षकांनी भयाचे वातावरण निर्माण केले आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

“रात्रभर मी आणि अभिषेक जागे आहोत,” असा ममतांचा दावा आहे. गेल्या १२ तासांत बरेच काही घडले आहे. २४ परगणा जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू झालेले यूपी कॅडरचे आयपीएस अजय पाल शर्मा यांना तातडीने हटवण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात रात्री याचिका दाखल करण्यात आली.

आज सकाळी नादिया येथे भाजपाच्या बूथ एजंटवर हल्ला झाला. आरामबागमध्ये तृणमूल आणि हुमायून कबीर यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भांगर येथे आयएसएफचा नेता नौशाद सिद्दीकी आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. या दोन पक्षांमध्ये अन्य काही ठिकाणीही मारामारीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडल्याचे वृत्त आहे. आयएसएफ आणि काँग्रेस हे दोन पक्ष अल्पसंख्याकांची मते घेणार असे चित्र दिसत असल्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते भडकले आहेत; ते या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत.

तृणमूलच्या उमेदवार मिताली बाग व्हीलचेअरवर बसून मतदानाला आल्या होत्या. आपल्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपाचे कार्यकर्ते हिंसाचार करीत असल्याचे ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. अजय पाल शर्मा यांनी तृणमूल नेते जहांगीर खान याच्या फाल्टा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची पाहणी केली. काल मंगळवारी अजय पाल शर्मा जहांगीरच्या घरी जाऊन त्याला कडक समज देऊन आले आहेत, त्यामुळे तो आधीच भडकला होता. सकाळपासून सुरक्षा दलांच्या मोठ्या संख्येने झालेल्या तैनातीमुळे आगीत तेल पडले.

“निवडणूक निरीक्षकांना धमक्या देण्याचा अधिकार नाही, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे,” असे तो सातत्याने सांगत होता. दहशतीच्या जोरावर ज्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले, ते आता “दहशत-दहशत” म्हणून ओरडत आहेत.

ममता बॅनर्जी भडकण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे काल रात्रीपासून सीआरपीएफने निवडणूक क्षेत्रातील गुंडांना उचलण्याचा कार्यक्रम सुरू केला. गेल्या दोन दिवसांत २४७३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या लोकांवर गुन्हेगारीची प्रकरणे दाखल आहेत, अशा लोकांना अटक करण्यात येते, जेणेकरून लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. याच कारवाईमुळे ममता बिथरल्या. “आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. काल अभिषेक बॅनर्जी यांनी जाहीर सभेत मतदारांना धमकी दिली होती. ४ मे नंतर तुम्हाला वाचवण्यासाठी दिल्लीतून कोण येतो तेच मी पाहातो, तोच अभिषेक बॅनर्जी सीआरपीएफच्या नावाने बोंबलतो आहे.

एक प्रकारे त्यांनी मान्य केले आहे की, अटक करण्यात आलेले गुंड हे तृणमूल काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत. याच गुंडांचा वापर दर निवडणुकीत दहशत माजवण्यासाठी, मतदारांना धमकावण्यासाठी आणि त्यांना घरी बसवण्यासाठी होत होता. यावेळी ती मुभा मिळाली नसल्यामुळे ममता संतापल्या आहेत; त्यांना लोकशाहीवर बुलडोझर चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड बंदोबस्तानंतरही तृणमूलचे कार्यकर्ते शक्य तिथे धमक्या आणि दहशतीचे प्रयोग करत होते. जिथे हे उघड झाले, तिथे सुरक्षा दलांनी त्यांची चांगलीच ‘खातीरदारी’ केली आहे.

केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि निवडणूक निरीक्षक हे सगळे ‘उपरे’ निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा ममता यांनी केला आहे. ‘बाहेरचे’ (Outsiders) हे कार्ड चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांवर याचा प्रभाव पडला की नाही, हे ४ मे रोजी स्पष्ट होईल. परंतु वृत्तवाहिन्यांवर मतदान करायला जाणारे किंवा मतदान करून आलेले मतदार ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, ते पाहता निवडणूक पहिल्यांदाच भयमुक्त वातावरणात होत असल्याचे चित्र दिसत आहे. “आम्हाला विकास हवा आहे, नोकऱ्या हव्या आहेत, संधी हवी आहे; परराज्यात नोकरीसाठी गेलेली आमची मुले घरी परतायला हवीत, इथे उद्योग आले पाहिजेत आणि महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे,” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. आजही लोक उघडपणे बोलायला तयार नाहीत; मात्र जे लोक न बोलता मतदान करत आहेत, ते भाजपाला करत आहेत असे मानायला वाव आहे, कारण त्यांचे तोंड बंद करणारे भय भाजपाचे नसून तृणमूलचे आहे.

पश्चिम बंगलाच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा आज सुरू आहे. हा टप्पा भाजपासाठी ज़ड मानला जात होता. कारण आज मतदान होत असलेल्या १४२ मतदार संघापैकी १२३ जागा जिंकण्यात २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळाले होते. भाजपाच्या वाट्याला फक्त १८ जागा आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात काही ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आहेत. भाजपाच्या कार्यालयावर, कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. दहशतीचे प्रयोग सुरू आहेत. तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. लोकशाहीवर बुलडोझर चालवल्याचा भास त्यांना होतो आहे. त्यांचा थयथयाट आणि लोकांचा मूड सांगतो आहे, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ दिसते आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान साधारणपणे पहील्या टप्प्याप्रमाणे विक्रमी होण्याची शक्यता आहे. ११ वाजेपर्यंत ४० टक्के, १ वाजेपर्यंत ६१.११ टक्के, तीन वाजेपर्यंत ७८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. साधारण याच प्रमाणात पहील्या टप्प्यात मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांवर २०२१ च्या तुलनेत किमान ८ ते दहा टक्के मतदान वाढण्याची स्पष्ट शक्यता दिसते आहे. पहील्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या तुलनेत दुसरा टप्प्यात वाढ झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

२०२१ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का ८२.३० टक्के होते. यंजा त्यात सुमारे १० टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे. हे वाढलेले मतदान ममता बॅनर्जी यांच्यासाठी आहे, असा दावा करणे धाडसाचे ठरेल. वाढलेले मतदान हिंदूंचे आहे. ते परीवर्तनासाठी आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी आहे, हिंदू धर्म टीकावा, विनाविघ्न दुर्गापूजा करता यावी, रामनवमी साजरी करता यावी, गंगापूजन करता यावे, हिंदू म्हणून भयमुक्त जगाता यावे, प.बंगालमध्ये उद्योग यावेत रोजगार मिळावेत म्हणून हे मतदान झाले आहे.

मुस्लीम आणि महीला मतदार हा ममता यांच्या सत्तेचा आधार आहे. या दोन घटकांपैकी महीला मतदार यावेळी तृणमूल पासून फारकत घेऊन भाजपाच्या पारड्यात मत टाकतील असे चित्र निर्माण झालेले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महीला मतदारांची संख्या आणि उत्साह खूपच जास्त दिसतो आहे. भयमुक्त वातावरणात महीला मतदान करीत आहेत. शहरात सुद्धा महीला मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. कोलकात्यात आज पाऊस पडला, तरी लांबच लांब रांगा लावून महिला मतदान करीत होत्या.

भवानीपूर मतदार संघातून लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केलेला संताप, निवडणुकीचे चित्र स्पष्ट करून जातो आहे. लोकशाहीवर बुलडोझर फिरवण्यात येतो आहे. निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत, हे रात्रभर सुरू आहे. निवडणूक निरीक्षकांनी भयाचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे.

रात्रभर मी आणि अभिषेक जागे आहोत, असा ममतांचा दावा आहे. गेल्या १२ तासात बरेच काही घडले आहे. २४ परगणा जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू झालेले यूपी कॅडरचे आय़पीएस अजय पाल शर्मा यांना तात्काळ हटवण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात रात्री याचिका दाखल कऱण्यात आली.

नादीया येथे भाजपाच्या बुथ एजण्टवर हल्ला झाला. आरामबाग मध्ये तृणमूल आणि हुमायून कबीर याच्या इंडीयन सेक्युलर फ्रण्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आरामबाग येथे हाणामारी झाली. भानगर येथे आयएसएफचा नेता नौशाद सिद्दीकी आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. या दोन पक्षांमध्ये अन्य काही ठिकाणीही मारामारीच्या घटना आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडल्याचे वृत्त आहे. आयएसएफ आणि काँग्रेस हे दोन पक्ष अल्पसंख्यकांची मते घेणार असे चित्र दिसत असल्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते भडकले आहेत. ते या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत.

तृणमूलच्या उमेदवार मिताली बाग व्हीलचेअरवर बसून मतदानाला आल्या होत्या. आपल्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. भाजपाचे कार्यकर्ते हिंसाचार करीत असल्याचे नरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. अजय पाल शर्मा यांनी तृणमूल नेते जहांगीर खान याच्या फाल्टा मतदार संघात अनेक गावांमध्ये कायदा सुरक्षेची पाहाणी केली. काल मंगळवारी अजय पाल शर्मा जहांगीरच्या घरी जाऊन त्याला कडक समज देऊन आले आहेत. त्यामुळे तो आधीच भडकला होता. सकाळपासून सुरक्षा दलांच्या मोठ्या संख्येन तैनातीमुळे आगीत तेल पडले.

निवडणूक निरीक्षकांना धमक्या देण्याचा अधिकार नाही. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पाहीजे, असे तो सातत्याने सांगत होता. दहशतीच्या जोरावर ज्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले, ते आता दहशत दहशत म्हणून ओरडतायत.

ममता बॅनर्जी भडकण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे काल रात्रीपासून सीआरपीएफने निवडणूक क्षेत्रातील गुंडांना उचलण्याचा कार्यक्रम सुरू केला. गेल्या दोन दिवसात २४७३ दाखलेबाजांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या लोकांवर गुन्हेगारीची प्रकरणे दाखल आहेत, अशा लोकांना अटक करण्यात येते. जेणे करून लोकशाही प्रक्रीयेत अडथळा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. याच कारवाईमुळे ममता बिथरल्या. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

एक प्रकारे त्यांनी मान्य केले आहे की, अटक करण्यात आलेले दाखलेबाज गुंड हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. याच गुंडांचा वापर दर निवडणुकीत दहशत माजवण्यासाठी, मतदारांना धमकावण्यासाठी, त्यांना घरी बसवण्यासाठी होत होता. यावेळी ती मुभा मिळाली नसल्यामुळे ममता संतापल्या आहेत, त्यांना लोकशाहीवर बुलडोझर चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड बंदोबस्तानंतरही तृणमूलचे कार्यकर्ते शक्य तिथे धमक्या, दहशतीचे प्रयोग करत होते. जिथे हे उघड झाले तिथे सुरक्षा दलांनी त्यांची चांगलीच खातीरदारी केली आहे.

केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान, निवडणूक निरीक्षक हे सगळे उपरे निवडणूक प्रभावित कऱण्याचा प्रय़त्न करीत असल्याचा दावा ममता यांनी केला आहे. बाहेरचे कार्ड चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांवर याचा प्रभाव पडला की नाही, हे ४ मे रोजी स्पष्ट होईल. परंतु वृत्तवाहीन्यांवर मतदान करायला जाणारे किंवा मतदान करून आलेले मतदार ज्या प्रकारच्या प्रतिक्रीया देत आहेत, ते पाहाता निवडणूक पहील्यांदाच भयमुक्त वातावरणात होत असल्याचे चित्र दिसते आहे. आम्हाला विकास हवा आहे, नोकऱ्या हव्या आहेत, संधी हवी आहे, परराज्यात नोकरीसाठी गेलेली आमची मुले घरी परतायला हवी, इथे उद्योग आले पाहीजेत, महीलांना सुरक्षा मिळाली पाहीजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रीया लोक देत आहेत. आजही लोक उघडपणे बोलायला तयार नाहीत, जे लोक न बोलता मतदान करतायत ते भाजपाला करतायत असे मानायला वाव आहे. कारण त्यांचे तोंड बंद करणारे भय भाजपाचे नसून तृणमूलचे आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा