25 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरसंपादकीयमुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न...

मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…

एका मुस्लिम वक्त्याने आरएसएस आणि मोदींचा पराभव करण्यासाठी मुस्लिमांनी शंभरटक्के मतदार केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते.

Google News Follow

Related

मुस्लिम मतदार काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने वळतो आहे, असे चित्र दिसत असल्यामुळे चवताळलेल्या काँग्रेससारख्या तथाकथित सेक्युलर पक्षांनी थेट औंरगजेबासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. तुष्टीकरणासाठी कमरेत कोण अधिक वाकतो याची स्पर्धा लागली आहे. जो तुमको हो पसंद वही बात करेंगे… ही या पक्षांची भूमिका आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम मतदार कोणाची बाजू घेणार? ट्रीपल तलाक हा कुराणाचा आदेश म्हणणाऱ्या शरद पवारांसारख्या नेत्याला टाळी देणार, की ट्रिपल तलाक गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना? हा कळीचा मुद्दा आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत मुस्लिमांनो ‘आरएसएसचा पराभव करण्यासाठी शंभर टक्के मतदान करा’, अशी हाळी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधीच औरंगजेबप्रकरणी केलेल्या विधानावर गुडघे टेकून बांग दिली होती. त्यामुळे भाजपा आणि सेक्युलर पक्षांच्या मुस्लीम भूमिकेत असलेला फरक ठळकपणे समोर आला आहे.

भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देशभरात तीन लाख मुस्लीम कार्यकर्ते मुस्लीम मतदारांशी संपर्क साधणार आहेत. त्यांचे भाजपाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे जाहीर केले होते. परंतु त्यांची भूमिका लांगूलचालनाची नाही. भाजपाने आजवर ज्या मुद्द्यांवर आवाज उठवला. त्याच मुद्यांना घेऊन भाजपाचे कार्यकर्ते मुस्लिमांकडे जाताना दिसतायत. कलम ३७० आणि ट्रिपल तलाक हटवण्याचा निर्णय मुस्लिमांच्या हिताचा होता, असे सिद्दीकी यांनीही ठणकावून सांगितले आहे.

हे ही वाचा:

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

परिसरासोबतच मने साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज

भाजपावर नेहमीच हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा आरोप केला जातो. परंतु हे धंदे कोणाचे याचा उलगडा कसबा पोटनिवडणुकी दरम्यान होतो आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारसभेत एका मुस्लिम वक्त्याने आरएसएस आणि मोदींचा पराभव करण्यासाठी मुस्लिमांनी शंभरटक्के मतदार केले पाहिजे. ही निवडणूक नसून जंग आहे, त्यामुळे दुबई, सौदी येथे कामधंद्यासाठी गेलेल्या मुस्लीमांनीही मतदानासाठी इथे आले पाहीजे, असे आवाहन या मंचावरून करण्यात आले.

या आवाहनाचा अर्थ स्पष्ट आहे. मुस्लिमांची मोट बांधण्यासाठी त्यांना भाजपाची भीती दाखवली जाते आहे. मुस्लिमांचे भले करण्याचे धोरण हे पक्ष सांगत नाहीत. त्यांना औंरगजेबाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अलिबाग येथे घेतलेल्या पक्षाच्या अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात आम्ही मुस्लिमांमुळे सत्तेवर आलो, अशी जाहीर कबुली दिली होती. औरंगजेब हिंदूविरोधी नव्हता, असे सर्टीफीकेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पवारांचे चेले जितेंद्र आव्हाड यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

औरंगजेबाला क्रूर म्हटल्याबद्दल त्यांनी काल परवा मुस्लिमांची माफी मागितली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या निर्लज्ज विधानांवर ठाम राहणारे आव्हाड मुस्लीम मतांसाठी सरपटायलाही तयार असतात. त्यांच्याच पक्षाचे प्रदेश चिटणीस सैयद अली अशरफ यांनी औरंगजेबाला क्रूर म्हटल्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसेल, असा दम दिला होता. देशातील मुस्लीम समाजाला खरेतर क्रूरकर्म्या औंरगजेबाशी जोडण्याचे अली अशरफला काही कारण नव्हते. धर्म कोणताही असो देशभक्त व्यक्तिला औंरंगजेबाच्या कृत्याबाबत संताप असलाच पाहिजे. राष्ट्रवादीच्या बाजारबुणग्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधल्यामुळे लाजलज्जाही सोडलेली आहे. अली अशरफने दम दिल्यामुळे आव्हाड गारठले. माझे विधान इतिहासाबद्दल होते, दिनबद्दल नव्हते. तरीही कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे सांगून त्यांनी आपण मतांसाठी नागिण डान्स करायला तयार आहोत, याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नावाशिवाय जे चार पावलंही चालू शकत नाहीत त्या उद्धव ठाकरे यांना उघडपणे असे थेट सरपटणे परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी मुस्लीम मतांसाठी किंचित वेगळा मार्ग निवडलाय. हिंदू धर्माची नालस्ती करणाऱ्या प्रत्येकाला ते जवळ घेतायत. राहुल गांधी, कन्हैया कुमार यांची गळाभेट घेतायत.   मुस्लीम अनुनयाच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उद्धव ठाकरे अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्याकडे बोट दाखवतात. बोहरा समाजातील काही मान्यवरांची अलिकडे मोदींनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भेट घेतली. मोहनराव भागवत मशिदीत गेले होते, याची आठवण यावेळी त्यांनी मीडियाला करून दिली होती. मोहनराव भागवत मशिदीत गेले होते. मदरशातील विद्यार्थ्यांना त्यांनी भारत माता की जय ही घोषणा द्यायला सांगितले. आपले पूर्वज एकच होते, हे ते नेहमीच मुस्लीम नेत्यांना सांगत असतात. उद्धव ठाकरे हे करू शकतील काय? मतांसाठी औरंगजेबाविरोधात केलेल्या विधानाबाबत माफी मागणाऱ्या आव्हाडांचा ते निषेध करू शकतात का?

एक राजकीय पक्ष म्हणून भाजपाने सब का साथ ही घोषणा दिली आहे. त्यामुळे मुस्लीमांनाही जोडण्याचा प्रयत्न हा पक्ष करतो आहे. परंतु त्यासाठी त्यांना ना राम मंदिराचा मुद्दा सोडला, ना काशी विश्वेश्वराचा. ट्रिपल तलाक संपवला, कलम ३७० च्या मुद्यावर तडजोड केली नाही. हे शिल्लक सेनेला झेपेल काय? त्यांचे नेते संजय राऊत यांनी तर कलम ३७० रद्द केल्यानंतर काय उपयोग झाला? असे विधान वारंवार केले आहे. काश्मीर मधील हिंदूंच्या पलायनावर बेतलेल्या काश्मीर फाईल्स या सिनेमावरही त्यांनी जहरी टीका केली होती.

वडिलांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदय सम्राट हे पद खूुटीला टांगण्याची, सावरकरांचा अपमान मूग गिळून ऐकण्याची वेळ ज्यांच्यावर आली ते मुस्लीम समाजाचा पाठिंबा आपल्या शर्तीवर मिळवतील याची शक्यता खूपच कमी आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात मुस्लीम कोणाच्या बाजूने उभे राहणार, हा प्रश्न मुस्लीम समाजाचे भविष्य निश्चित करणारा आहे. आपली वाटचाल अब्दुल कलामांचा वारसा सांगून व्हावी की औरंगजेबाचा याचा निर्णय करण्याची ही वेळ आहे. (न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा