34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषपरिसरासोबतच मने साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज

परिसरासोबतच मने साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज

संत गाडगे बाबांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Google News Follow

Related

‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असे कीर्तन सुरु करत आपल्या ओघवत्या शैलीत मनाची आणि आणि आजूबाजूच्या परिसराची सफाई करण्याचे काम गाडगे बाबा करत असत. वयाच्या फक्त आठव्या वर्षी आपले घरदार सोडून गाडगे बाबा ह्यांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याकडे फक्त एक झाडू आणि एखादे कापड असत त्यात ते संपूर्ण परिसर स्वच्छ करून त्यानंतर मंदिरात स्वतःच्या आवाजात छान भजन, कीर्तन करत असत.

त्यामुळे ते संपूर्ण परिसराबरोबरच प्रत्येक माणसाच्या मनाची पण स्वच्छता करत असत. गाडगे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीच्या शेडगाव इथे झाला. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांनी लहानपणापासूनच समाजात जनजागृती करायची असे ठरवले होते. माणसाच्या रूपातील ते महान संत होते. गावोगावी फिरून ते लोकांचे प्रबोधन करत असत. डोक्यावर झिंज्या , खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर एका कानांत फुटक्या बांगडीची काच आणि एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेष असायचा. विसाव्या शतकात त्यांचा समाज सुधारणेसाठी मोठा वाटा होता.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

आपल्या विचारांच्या माध्यमातून त्यांनी देव हा दगडात नसून तो प्रत्येक माणसात आहे हे त्यांनी पटवून दिले. आपल्या भजन कीर्तनात आलेल्या लोकांना, महिलांना सहभागी करून घेउन त्यांना चांगले – चांगले दाखले देत शिक्षणाचे, स्वच्छतेचे महत्व पटवून देत असत. गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांना आपला गुरु मानत पण माझा कुणी शिष्य नाही आणि मी कोणाचा गुरु नाही असे पण ते म्हणत.

गाडगे बाबांचे कार्य

समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ठ रूढी परंपरा, दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यासाठी त्यांनी भजन कीर्तनाचा मार्ग अवलंबला. आपल्या कीर्तनात लोकांना सहभागी केल्यामुळे त्यांना त्यांचे दुर्गुण दिसून येत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज घेऊ नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, अस्पृश्यता पळू नका, देवा धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्याची हत्या मुळीच करू नका असे त्यांचे साधे सोपे उपदेश असत. गाडगेबाबांच्या जयंतीनिम्मित त्यांना शतशः नमन.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा