38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरसंपादकीयभाजपात तरी टिपू भक्त नको...

भाजपात तरी टिपू भक्त नको…

हिंदूंचे शिरकाण करणारा टिपू आणि श्रीराम यांची भक्ती एकाच वेळी होऊ शकत नाही.

Google News Follow

Related

मविआच्या काळात मुंबई, मालवणी परिसरातील एका उद्यानाचे नामकरण हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाने केल्याचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला होता. मुंबईचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी ही उचापत केली होती. सत्ताधारी शिवसेनेवर भाजपाने या मुद्द्यावरून जोरदार आगपाखड केली होती.

 

भाजपाने अत्यंत योग्य पद्धतीने हा मुद्दा हाताळला. आंदोलन केले, सत्तेवर आल्यानंतर उद्यानाचे नामकरण रद्द केले. आता या घटनेला जवळजवळ वर्ष उलटून गेले आहे. जेव्हा भाजपाने मुंबईत या मुद्द्यावरून रण पेटवले, तेव्हा पुण्यात एक पोस्टर व्हायरल झाले होते. पुण्याचा अल्पसंख्यांक मोर्चाचा अध्यक्ष अन्वर पठाण यांने २० नोव्हेंबरला टिपू जयंतीनिमित्त त्याला अभिवादन केले होते.

 

हा अन्वर पुण्यातील येरवाडा भागात माथाडी युनियन चालवतो. त्याच्या पोस्टरमुळे पुण्यातील तमाम हिंदुत्ववादी खवळले होते. यंदाच्या वर्षी वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पुण्यात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. या कार्यक्रमात अन्वर पठाण राबत असल्याचे चित्र अनेकांनी पाहिले.

 

हा २०१९ मध्ये पक्षात आला. त्यानंतर थेट पुणे शहराच्या टीममध्ये त्याचा समावेश झाला. अन्वर पठाण आता पुणे शहर अल्पसंख्यांक मोर्चाचा अध्यक्ष नाही. त्याच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. महाराष्ट्रात मविआचे सरकार गेल्यानंतर जेव्हा महायुती सरकार आले होते. तेव्हा हे सरकार हिंदुत्ववाद्यांचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निसंदिग्धपणे सांगितले होते. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी याचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे.

 

प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरी भोवती पडलेला अनधिकृत बांधकामांचा वेढा या सरकारने कठोर कारवाई करून उठवला. जमीनदोस्त केला. मालवणीतील टिपू उद्यानाची पाटी याच सरकारने उखडून काढली आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्याची जाहीर घोषणाही केली. परंतु एका बाजूला भाजपाचे वरिष्ठ छातीवर हात ठेवून आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असे सांगत असताना पुणे शहरातील एक पदाधिकारी टिपूची भक्ती करतो हे चित्र अनेकांना रुचणारे नव्हते. धीरज घाटे हे पुणे भाजपाचे अध्यक्ष होईपर्यंत हा अन्वर पठाण भाजपाचा पदाधिकारी होता. नंतर त्याला नारळ देण्यात आला. त्यामुळे कदाचित यंदाच्या टिपू जयंतीला त्याला पोस्टरबाजी करून अभिवादन करण्याची संधी त्याला मिळाली नाही.

 

हे ही वाचा:

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!

‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’

विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!

आपल्या पक्षात अल्पसंख्याक समुदायाचे लोक आहेत, हे दाखवण्यासाठी कोणालाही पक्षात घ्यायचे आणि त्याला पदाचा शेंदूर लावायचा असे सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे. पक्षाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे रुचत नाही. याची गरजही नाही. कडवट हिंदुत्व स्वीकारून देखील उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढू शकते. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खणखणीत केल्यामुळे त्यांच्या पाठीशी काही प्रमाणात का होईना मुस्लिम समाज उभा राहू शकतो, हे पुरेसे बोलके आहे. लोकांचे भले केले तर लोक तुमच्या मागे येतात. त्यासाठी लांगुलचालनाची गरज नाही. मुळे पक्ष वाढत असताना पक्षात टीपू आणि अफजल खानाची भक्ती करणारे शिरणार नाहीत, आलेच तर जुनी भूमिका सोडून येतील, याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायला हवी.

 

धीरेंद्र शास्त्र खणखणीत हिंदुत्वाबाबत बोलतात. त्यांच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात जय श्रीराम आणि जय हिंदूराष्ट्रच्या घोषणा दिल्या जात होत्या. देवेंद्रजींनीही या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्या कार्यक्रमात हा अन्वर पठाणही वावरत होता. अशा लोकांना जे लोक पक्षात आणतात. त्यांना पद देतात, त्यांना कोणी तरी सांगण्याची गरज आहे की हिंदूंचे शिरकाण करणारा टिपू आणि श्रीराम यांची भक्ती एकाच वेळी होऊ शकत नाही.

 

हिंदू समाज कितीही सहिष्णू असला तरी दर वर्षी रावण दहन करतो हे या लोकांना सांगण्याची गरज आहे. पक्षात आणताना जर पक्षाची विचारधारा माहीत नसेल तर असे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले काय आणि भाजपामध्ये असले काय, एकूण एकच.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा