भारताबरोबर युद्ध करण्याची खुमखुमी होती ती पाकिस्तानचा लष्करप्रमख मुनीरची आणि त्याच्याच भडकाऊ भाषणानंतर पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर जो बदला भारतीय सैन्य दलाने घेतला त्यानंतर मात्र पाकिस्तानची तर झोप उडालीच मात्र जगभरानं तोंडात बोट घातलं. गेले तीन दिवस आपण बघतोय की पाकिस्तानचा एक ड्रोन, एक मिसाईल आपल्या देशामध्ये पडू शकलं नाही. कितीतरी शहर पाकिस्तानने लक्ष्य केलेली होती मात्र भारतीय सैन्य दलाने त्यांचे सगळे मिसाईल्स, ड्रोन हे हवेतच निष्प्रभ केले. अखेर आज त्यांनी युद्धविरामासाठी भारतीय सैन्य दलाला विनंती केली आणि ती विनंती भारतीय सैन्यदलानं मान्य केल्यामुळे आता युद्धविराम जाहीर झालेला आहे. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांकडून फायरिंग जे सुरू होतं ते फायरिंग थांबवण्यात आलेल आहे. १२ मे रोजी यासंदर्भात दुपारी १२ वाजता दोन्ही देशांच्या सैन्य दलाच्या प्रमुखांच्या मध्ये बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत पुढच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.
एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हा जो युद्धविराम केलेला आहे हा युद्धविराम भारताच्या काही ना काही अटी या पाकिस्तानने मान्य केल्या त्यामुळेच भारताने युद्धविराम जाहीर केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती संध्याकाळी दिली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन युद्धविराम संदर्भातली माहिती ही पत्रकारांना दिली. आपला लढा हा पाकिस्तान बरोबर नव्हताच. आपला लढा हा पाकिस्तानकडून जो आतंकवाद्यांना नेहमी पाठिंबा दिला जातो त्याच्या विरोधामध्ये होता. कारण पहिल्या दिवसापासून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान मधला सर्वसामान्य नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्य हे टार्गेट केलेलं नव्हतं. पहिला हल्ला हा पाकिस्तानमधल्या नऊ आतंकवादी ठिकाणांवर हा केलेला होता. त्यामध्ये अनेक आतंकवादी ठार केले. आजच सैन्य दलाच्या वतीने ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे, फोटो हे सगळं जाहीर केलेला आहे. शेवटी काय आहे की पाकिस्तानचे भांडवल संपलं. पाकिस्तानला कळलं की आपली लायकी काय आहे. आपण किती लायकीत राहायला हवं. तेच आज त्यांच्या शेपूट घालण्याने स्पष्ट झालेल आहे. भारताने खुमखुमी ठेचून काढली. मोडून काढली आणि शेवटी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलेलं आहे.
एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला भारताने आपली ताकद ही दाखवून दिलेली आहे. उरी आणि बालाकोट ही त्याची स्पष्ट उदाहरण होती. तरीसुद्धा पाकिस्तानने कुरापत यावेळी केली आणि भारताला डिवचण्याचं काम केलं. मात्र पूर्वीचा भारत हा राहिलेला नाही. ही गोष्ट आता पाकिस्तानच्या लक्षात आली असेल कारण यापूर्वी कधीही कडक धोरण हे भारताकडून अवलंबण्यात आलेलं नव्हतं. झालेल्या गोष्टीचा निषेध करणं आणि नंतर सामोपचाराच्या बाता करणं हेच आतापर्यंत भारताने केलेलं होतं. मात्र पहिल्यांदाच सिंधू नदीचा जो काही करार आहे तो करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. सिंधू नदीतून जाणारे पाणी सुरुवातीला रोखलं. त्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणावर पाऊस झाला आणि पुन्हा हे युद्ध सुरू झाल्यानंतर ते पाणी सोडायला सुरुवात केली त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानमध्ये दुष्काळ पाडायचा का पाकिस्तान मध्ये जलप्रलय करायचा हे भारताच्या हातात आहे. हे भारताने या वेळेला दाखवून दिलेल आहे. भारत काही करू शकतो. भारताच्या छोट्या छोट्या गोष्टींवर पाकिस्तान अवलंबून आहे त्यामुळे पाकिस्तानने भारतापुढं नमूनच राहिलं पाहिजे. पाकिस्तानने भारताशी हुशारी करता कामा नये हे या चार दिवसात भारतीय सैन्य दलाने दाखवून दिलेल आहे.
भारतीय सैन्य दलान आपली ताकद केवळ पाकिस्तानलाच दाखवून दिली नाही तर ती जगाला दाखवून दिलेली आहे. चीन सारख्या देशाने सुद्धा ऐन वेळेला आपला रंग बदलला आणि आतंकवाद्यांना आम्ही पसंत करत नाही अशी आपली भूमिका ही जाहीर केली. एका दगडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पक्षी या निमित्ताने मारलेले आहेत आणि जगभरामध्ये भारताची एक प्रतिमा अत्यंत प्रतिष्ठेची करण्याचं काम या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भारताने जी कारवाई पाकिस्तानवर केली त्या कारवाईन पाकिस्तानचे कंबरड मोडलं. आणि या चार दिवसांमध्ये भारतानं जी भूमिका ही मांडली जगभरात त्या भूमिकेनंतर जगभरातले सगळे देश भारताच्या मागे उभा राहिले. एकानेही भारताला थांबा असं म्हणण्याचे धाडस केलं नाही.
हे ही वाचा..
पाकिस्तान आला शरण! भारताच्या प्रत्युत्तरानंतर म्हणे जमीन, हवा, समुद्रात लष्करी कारवाई नको
…तर भारत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना युद्ध मानणार! भारताचा अंतिम इशारा
बातम्या देताना हवाई हल्ला सायरनच्या आवाजाचा वापर करू नका!
पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक
दुसरीकडे काय झालं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शासकांच्या विरोधात पाकिस्तानमधला सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या देशाला नाव ठेवू लागला. स्वतःच्या देशातल्या शासकांच्या विरोधामध्ये रोज समाज माध्यमांवर ठाणाणा करू लागला आणि दुसरीकडे भारतातला सर्वसामान्य नागरिक हा भारतीय सैन्य दलाच्या माग ठामपणे उभा राहिला. आजच चंदिगडमध्ये हजारो युवक आणि युवती या भारतीय सैन्य दलाला मदत करण्यासाठी आम्ही स्व इच्छेन तयार आहोत, आम्ही जाणार आहोत असं सांगत होते. त्यासाठी अर्ज भरायला तिथं एका मैदानामध्ये रांगा लावलेल्या होत्या. हे देश प्रेम भारताने या वेळेला जगाला दाखवून दिले. भारतातल्या नागरिकांवर जे संस्कार झालेले आहेत ते संस्कारच इथे महत्त्वाचे ठरतात. भारतातला नागरिक अधि राष्ट्र हेच म्हणतो आधी माझा देश आधी माझी भारत माता यालाच प्राधान्य देतो. हे पुन्हा एकदा यानिमित्ताने स्पष्ट झाल आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना हे युद्ध सुरू झाल्यापासून आपलं तोंड काळ केलेल आहे. कुठे तो मुनीर जाऊन लपलेला आहे कुठल्या बिळात तो सापडायला तयार नाही. स्वतःच्या कुटुंबाला त्याने परदेशी पाठवलेल आहे आणि कुठल्याही क्षणी तो पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत होता अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली होती.
शेवटी पाकिस्तानने भीक मागितली युद्ध थांबवण्याची विनंती केली भारताने ती मान्य केली. ठीक आहे. आनंदाची गोष्ट आहे शेवटी युद्ध हा एक शेवटचा वाईट असा उपाय असतो. तो कुणालाही नको असतो. कारण युद्धामुळे देशाचं अतोनात नुकसान होत असतं. आणि ते झालं गेले चार दिवस आपण बघतोय. परंतु भारतानं कुठल्या अटींवर हा युद्धविराम केला त्या अटी बघणं महत्त्वाचं ठरेल ते जेव्हा १२ तारखेच्या बैठकीनंतर बाहेर येईल तेव्हा आपल्याला ते समजेल तोपर्यंत आपण वाट बघू.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







