व्हीएतनामच्या दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअ मॅक्रोन यांचा एक व्हीडीयो व्हायरल झाला आहे. मॅक्रान यांचे विमान व्हीएतनामच्या हनोई विमानतळावर उतरले. विमानाचे गेट खुलताच त्यांची पत्नी ब्रिजिट हीने मॅक्रान यांच्या मुस्कटात लगावत असल्याचे दृष्य स्वागताला उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिले. स्वत:ला सावरून मॅक्रॉन सपत्नीक विमानाच्या शिडीवरून उतरले. पश्चिमी सभ्यतेनुसार परदेश दौऱ्यावर आलेले जोडपे, हातात हात घालून उतरते. तसा काही प्रकार दिसला नाही. दोघांचे चेहरे कोरे होते. जे काही लोकांना पाहिले तो पत्नीचा लडीवाळपणा होती की ब्रिजिट यांनी खरोखरच त्यांना लाफा मारला होता, याबाबत आता चर्चा सुरू आहे. काहीही असो परंतु या निमित्ताने युगोनुयुगे दडपलेले एक सत्य ठसठशीतपणे जगासमोर आलेले आहे.
जगात ज्याला सगळे घाबरतात तो बायकोला घाबरून असतो, असे म्हणतात. बाहेर डरकाळ्या फोडणारे अनेक घरी भिगी बिल्ली बनून जातात. बायकोचा पार चढला की तोफेच्या समोर उभे राहण्यापेक्षा वातावरण थंड व्हावे म्हणून बाहेर
एक फेरफटका मारून येणारेही बरेच आहेत. चार भिंतीच्या आड जे जग असते ते बाह्य जगापेक्षा वेगळे असते ते असे.
मॅक्रॉन यांच्या व्हीएतनाम दौऱ्याची सुरूवातच अशी झाली. हा कम्युनिस्ट देश बहुधा भाडंवलशाही देशांना मानवत नाही. अमेरिकेने या देशाशी प्रदीर्घ काळ युद्ध केले. परंतु या छटाकभर देशाचा पराभव करणे त्यांना शक्य झाले नाही.
अमेरिकेला इथे थप्पड खावी लागली. फ्रान्सच्या अध्यक्षांना याच भूमीवर थप्पड खावी लागली, हा अजब योगायोग आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे हे प्रॉक्सी वॉर नाही, हे सुनियोजित युद्ध आहे…
माझा विरोध करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, मी हनुमानजींचा भक्त आहे!
फ्रेंच ओपन: बैडोसा कडून ओसाकावर धक्का देणारा विजय; बौल्टर दुसऱ्या फेरीत
सूर्यकुमार यादवचा विक्रमी फटका – मास्टर ब्लास्टरचा विक्रमही गडगडला!
मॅक्रॉन हे युरोपातील एका विकसित, शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. फ्रेंच लोक हे रोमॅण्टीक, कलाप्रेमी असतात असे म्हणतात. मॅक्रॉन हे वृत्तीने पक्के फ्रेंच आहेत. एमिन्स येथील जेस्यूईट स्कूलमध्ये वयाच्या १५ वर्षी ते त्यांच्या नाट्यकला शिक्षिकेवर लट्टू झाले. ब्रिजिट यांचे वय तेव्हा ३९ होते. त्या विवाहित होत्या. दोघांच्या वयात २४ वर्षांचे अंतर. ब्रिगिट त्यांना तीन मुलं होती. त्यांची लेक लॉरेन्स ही मॅक्रॉन यांच्याच वर्गात होती. एका नाटकाच्या दरम्यान म्रक्रॉन हे ब्रिगिट यांच्या जवळ आले. इम्यॅन्यूअल यांची विकेट गेली. ती ब्रिजिट यांनी काढली.
१९७७ हे इमॅन्यूअल यांचे जन्म वर्ष आहे. ब्रिजिट यांची लेक लॉरेन्सचा जन्मही त्याच वर्षीचा आहे. इमॅन्यूअल यांची शिक्षिकेसोबत असलेली भानगड त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी इम्यॅन्यूअलला शिक्षणासाठी पॅरिसमध्ये हलवले. परंतु लग्न करेन तर ब्रिजिटशीच हा इम्यन्यूअल यांचा निर्धार ठाम होता. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो
बंधन… असा हा मामला असावा. २००६ साली ब्रिजिट यांचा संसार मोडला. त्यानंतर २००७ साली त्यांनी इमॅन्यूअल
यांच्याशी विवाह केला. मॅक्रॉन यांना अपत्य नाही. सलग १९ एका स्त्रीशी त्यांनी प्रामाणिकपणाने संसार केला. व्हीएतनाम दौऱ्यावर असताना जे काही घडले ते आधी नाकारण्याचा प्रयत्न झाला. ते स्वाभाविक होते. त्यानंतर त्याला लाडीकपणा, खोडकरपणाचे नाव देण्यात आले. स्वत: मॅक्रॉन यांनीच हा खुलासा केलेला आहे.
हॉलिवूड बॉलिवूडच्या नटनट्यांचे खाजगी जीवन म्हणजे खुली किताब असते. राजकारण्यांचे मात्र तसे नसते. लफडी बाहेर आली तर कडेलोट निश्चित असतो. काँग्रेसच्या एका वरीष्ठ नेत्याचे एका न्यूज चॅनलच्या अँकरशी लफडे उघड झाल्यामुळे त्यांना म्हातारपणात विवाह करावा लागला. बिहारच्या एका राजपुत्राचा गेलेला बळी ताजा आहे. परंतु मॅक्रानला हे थप्पड प्रकरण शेकण्याची तशी शक्यता नाही. पश्चिमेत ही तशी सामान्य बाब आहे. ब्रिजिट यांची ही थप्पड विवाहबाह्य संबंधांसाठी होती की अन्य काही कारणामुळे हे उघड झालेले नाही, होण्याची शक्यताही नाही. २०१७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मॅक्रॉन यांच्यावर समलैंगिक संबंधांचा आरोप झाला होता. त्याची जाहीर चर्चाही झाली होती. हे आरोप मॅक्रॉन यांनी फेटाळले होते. पश्चिमी देशांमध्ये अशा कारणाचा फार बाऊ केला जात नाही. बिल क्लिंटन यांच्या सेक्रेटरीशी त्यांचे लफडे उघड झाल्यानंतरही हीलरी क्लिंटन यांनी त्यांच्याशी काडीमोड घेतला नाही. बडे बडे घरो मे ऐसी छोटी मोटी बाते होती
रहती है. मॅक्रॉन यांना मिळालेल्या थप्पडी मागे असेच एखादे कारण असू शकेल किंवा नसेलही.
ब्रिजिट त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या आहेतच शिवाय त्यांच्या शिक्षिकाही राहीलेल्या आहेत. शिक्षिकांना मारण्याचा अधिकार असतो, वयाने जास्त असलेल्या व्यक्तिलाही तो अधिकार असतो. मॅक्रॉन यांनी विवाहाची गळ घातल्यानंतर आपला मारण्याचा अधिकार अबाधित राहीला तरच विचार करेन अशी अट कदाचित ब्रिजिट यांनी घातली असण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी हिलरी यांनी बिल यांचे लफडे मोठ्या मनाने माफ केले होते. तीच दर्यादीली मॅक्रॉन यांनी दाखवली आहे. दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्यायही दिसत नाही.
एक गोष्ट मात्र व्हायरल झालेल्या त्या व्हीडियोमुळे स्पष्ट झालेली आहे. या जगात छळ किंवा दमन फक्त स्त्रियांचे होते हे एक मिथक आहे. पुरुषांनाही व्यवस्थित रगडले जाते. परंतु रडणे हा पुरुषांचा स्वभाव नसल्यामुळे मार खाऊनही ते सुहास्य वदनाने कॅमेराला सामोरे जातात. बायकोचा मार हा लाडीकपणा आहे, असे जाहीरपणे सांगतात. मॅक्रॉन यांच्या या कृतीमुळे समस्त पुरुष जातीमध्ये त्यांच्याबद्दल जो काही आदर आहे, तो वाढला आहे. तळागाळातील गोरगरीब पुरुषांना एक खूप मोठा दिलासा मिळाला आहे की लाटणे फक्त आपल्यावरच चालत नाही, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षाला सुद्धा याच अग्निदिव्यातून जावे लागते. हे तमाम पुरुष मॅक्रॉन यांचे मनोमन आभार मानतायत. बराच काळ दडवले गेलेले एक सत्य त्यांच्यामुळे आज जगासमोर आलेले आहे. मॅक्रॉन यांच्या शिक्षिकेने हा जगाला दिलेला एक धडा आहे. समस्त पुरूष जात या दोघांची
आभारी राहिल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







