महानगर पालिकेमध्ये त्यांची सत्ता असताना जो काही धिंगाणा घातला, तमाशे केले. डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना डिनो मोरियाच्या घरी जास्तीत जास्त थांबायचे आणि म्हणून डिनो मोरियाची चौकशी होणे हे आदित्य ठाकरेंचे पितळ उघडे होण्यासारखे आहे. आज मुंबईमध्ये जी काही पाण्याची परिस्थिती आहे आणि अन्य काही समस्या आहेत, त्याला संपूर्ण आदित्य ठाकरेंची नाईट लाईफ टोळी जबाबदार आहे. आज मिठी नदी असो, सर्व टेंडर असो डिनो मोरिया त्यांचा लाडकाच होता. खरे म्हटले तर “डिनो मोरिया ही मातोश्रीची सून आहे,” असा चिमटा आदित्य ठाकरेंना मंत्री नितेश राणे यांनी काढला.
मीठी नदीच्या सफाई घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) काल बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावले होते. तसेच या प्रकरणी डिनो मोरियाचा भाऊ सैंटिनो मोरिया याला देखील पथकाने चौकशीसाठी बोलावले होते. मीठी नदीची सफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्री – जसे की गाळ काढणाऱ्या आणि खोल खणणाऱ्या मशीनसाठी दिला गेलेला निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पथकाकडून पुढील कारवाई सुरु आहे.
याच दरम्यान, डिनो मोरियाला चौकशीसाठी आत घेतल्यामुळे आदित्य ठाकरेंना फार दु:ख झाल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. तसेच मुंबईत तुंबलेल्या पाण्याला आदित्य ठाकरे आणि नाईट लाईफ टोळी जबाबदार असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा :
सावरकरांच्या ‘अनादि मी.. अनंत मी…’ गीतास शासनाचा ‘हा’ प्रथम पुरस्कार प्रदान!
राहुल गांधींना झापणाऱ्या न्यायमूर्तींचे फडणवीसांनी मानले आभार!
आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले
आजी-आजोबांच्या बटव्यातली ‘हींग’ करते अनेक आजारांवर उपाय!
मंत्री नितेश राणे म्हणाले, डिनो मोरियाचे सर्व सीडीआर तपासले तर बहुतेक कॉल आदित्य ठाकरेंचे आहेत. म्हणून आदित्य ठाकरेंनी इतर गोष्टींवर न बोलता डिनो मोरियाशी व्यावसायिक आणि वैयक्तिक काय संबंध आहेत, यावर त्यांनी बोलावे.
अडीच वर्षांपूर्वी मविआची सत्ता होती, मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता होती. तेव्हा यांनी काय दिवे लावले. त्यावेळी नाईट लाईफ आणि इतर सर्व गोष्टींमध्ये आदित्य ठाकरेंचे डोके कधी वर आले नाही आणि आता मात्र तावातावाने बोलत आहात.
डिनो मोरियाच्या घरी त्यांनी थोडी मज्जा कमी केली असती तर मुंबईला थोडा त्रास कमी झाला असता. त्यांनी खुल्या व्यासपीठावर माज्यासमोर बसवावे त्यांचे थोंड कसे बंद करायचे ते मला माहिती आहे. हे सर्व माझे त्यांच्यावर आरोप आहेत, जर खोटे असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे मंत्री राणे म्हणाले. दरम्यान, मविआच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नितेश राणेंनी डिनो मोरियाला पालिकेचा सचिन वाझे असेही म्हटले होते.
