स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘अनादि मी.. अनंत मी…’ या गीतास ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार – २०२५’ चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण ‘वर्षा’’ या शासकीय निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची प्रेरणा देते.
त्यासोबतच, प्रचंड बुद्धिमत्तेने संभाजी महाराजांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. त्यांनी ग्रंथही लिहिले, कविताही लिहिल्या. म्हणूनच, त्यांच्या नावाने राज्याचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभाविकच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादि मी, अनंत मी..’ प्रचंड आत्मबळ असलेले गीत त्यांनी लिहिले आणि रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्ये, सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे रणजीत सावरकर, अशीलता राजे, स्वप्नील सावरकर, मंजिरी मराठे, अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
राहुल गांधींना झापणाऱ्या न्यायमूर्तींचे फडणवीसांनी मानले आभार!
आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले
आजी-आजोबांच्या बटव्यातली ‘हींग’ करते अनेक आजारांवर उपाय!
“हे मंदिर केवळ दगड-विटांची वास्तू नसून येथील कणाकणात ईश्वर आहे”
राज्याचे मुख्यमंत्री ट्वीटकरत म्हणाले, “अनादि मी, अनंत मी…” स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतील हे अमर गीत, राष्ट्रभक्तीच्या सागरात लाट उठवणाऱ्या शब्दांना आज मानाचा मुजरा. हे गीत प्रेरणादायक गाथा ठरली. या गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सावरकर कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी इतिहास घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि अनेक मान्यवरांच्या साक्षीने सावरकरांच्या स्मृतींना अजरामर करणारा क्षण.”
“अनादि मी, अनंत मी…” स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतील हे अमर गीत, राष्ट्रभक्तीच्या सागरात लाट उठवणाऱ्या शब्दांना आज मानाचा मुजरा! हे गीत प्रेरणादायक गाथा ठरली! या गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित… pic.twitter.com/dJN508DjEH— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 27, 2025
