केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५०वा जयंतोत्सव’ येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, माधवबाग ट्रस्टचे ट्रस्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनाचा लाभ घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. या मंदिराची स्थापना १८७५ साली झाली असून मंदिराला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. हे मंदिर केवळ दगड-विटांची वास्तू नसून प्रत्यक्षात येथे देवाचा वास आहे. त्यामुळेच येथे अखंडित सेवेचे कार्य सुरू आहे. गोसेवा असो किंवा समाजसेवा, माधवबागने नेहमीच पुढाकार घेतला आहे.”
हे ही वाचा :
३९ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
माझा विरोध करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, मी हनुमानजींचा भक्त आहे!
हरयाणातील एका कुटुंबाची कर्जबाजारीपणामुळे कारमध्येच आत्महत्या
फ्रेंच ओपन: बैडोसा कडून ओसाकावर धक्का देणारा विजय; बौल्टर दुसऱ्या फेरीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५०व्या जयंतोत्सवानिमित्त मंदिरासाठी दान केलेल्या दानशूर व्यक्तींचे स्मरण केले. यावेळी माधवबाग परिवाराचे कार्य अखंडपणे सुरू राहावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात मदतीची गरज भासल्यास आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे सांगितले.
