“हे प्रॉक्सी वॉर (दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेले) नाही, कारण ज्या दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानात करण्यात आले, त्यांना शासकीय सन्मान देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानचे झेंडे ठेवले गेले आणि त्यांना पाक लष्कराकडून सॅल्युट देण्यात आले. यावरून हे स्पष्ट होते की हे फक्त प्रॉक्सी वॉर नव्हे, तर पूर्णपणे नियोजित युद्धनीती आहे. युद्ध आधीच सुरू आहे आणि त्याला योग्य उत्तर दिलं जाईल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी गांधीनगर येथील भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.
पंतप्रधान म्हणाले, “हे पराक्रमींचं राष्ट्र आहे. आतापर्यंत आपण जी दहशतवादी हल्ले ‘प्रॉक्सी वॉर’ म्हणत आलो, ते आता या संज्ञेने संबोधणे ही चूक ठरेल. कारण, ६ मेनंतर ज्या दृश्यांनी देश पाहिला, त्यातून स्पष्ट होते की ही केवळ प्रॉक्सी वॉर नव्हे, तर एका ठराविक रणनीतीचा भाग आहे. ९ दहशतवादी तळ केवळ २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले गेले आणि तेही पूर्णपणे कॅमेऱ्यासमोर. ऑपरेशन सिंदूर हे निर्णायक पाऊल असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये केवळ २२ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, आणि संपूर्ण कारवाई कॅमेऱ्यासमोर केली गेली, जेणेकरून कोणीही पुराव्याची मागणी करणार नाही. या वेळी पुरावा विचारू नये म्हणूनच संपूर्ण कारवाई कॅमेऱ्यासमोर करण्यात आली,” असे त्यांनी ठणकावले.
हे ही वाचा:
“३ जूनला तुम्हाला सांगीन – आम्ही जगात सर्वात वर आहोत!”
स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला आणि अचानक स्फोट झाला!
माझा विरोध करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, मी हनुमानजींचा भक्त आहे!
पंजाब किंग्सची सिंहगर्जना – मुंबई इंडियन्सचा सात विकेटांनी पराभव
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्हाला कोणाशी वैर नाही. आम्ही शांततेत जगू इच्छितो. आम्हाला प्रगती करायची आहे, जेणेकरून आम्ही जगाच्या कल्याणात भर घालू शकू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सिंधू नदी करारावर टीका
“१९६० मध्ये झालेल्या सिंधू नदी करारामुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं,” असं सांगून मोदी म्हणाले, “जम्मू-कश्मीरच्या नद्यांवर उभारण्यात आलेल्या धरणांची साफसफाई (desilting) करण्यास मनाई करण्यात आली होती. या धरणांचे तळाचे दरवाजे कधीही उघडायचे नाहीत, असं ठरवलं गेलं. ६० वर्षांपासून हे दरवाजे बंद आहेत. १००% क्षमतेने भरायच्या धरणांची क्षमता आता केवळ २-३% इतकी उरली आहे. “मी अजून काहीच केलं नाही आणि तरीसुद्धा शेजारील देशात घाम फुटला आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “धरणे स्वच्छ करण्यासाठी फक्त लहान दरवाजे उघडले आणि तिथे आधीच पूर आला आहे, असा चिमटाही मोदींनी काढला.
दहशतवाद निर्मूलनाचा संकल्प
“शरीर कितीही मजबूत असो, पण एखादा काटा टोचला तरी संपूर्ण शरीराला त्रास होतो. आता आम्ही ठरवलं आहे की तो काटा – म्हणजे दहशतवाद – काढून टाकायचाच,” असं म्हणत त्यांनी देशाने दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले.”पाकिस्तान भारताला युद्धात हरवू शकत नाही, म्हणून त्यांनी प्रॉक्सी वॉर सुरू केले. भारतावर सातत्याने हल्ले झाले आणि देशवासीयांनी हे सर्व सहन केलं,” असं त्यांनी सांगितलं.
