आयपीएल 2025 मध्ये टॉप-2 मध्ये स्थान पक्कं करत पंजाब किंग्ज संघाने इतिहासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. संघाचा आत्मविश्वास सळसळतोय – आणि त्याचे प्रतिनिधित्व करत, फलंदाज शशांक सिंह म्हणतो, “आधीच अर्धं काम पूर्ण झालं आहे. पण पूर्ण काम ३ जूनला होईल… रात्री १२ वाजता पत्रकार परिषद होईल – आणि त्याच वेळी मी सांगीन, हो, आम्ही जगात सर्वात वर आहोत!”
आत्मविश्वास काय करु शकतो, हे पंजाब किंग्जने दाखवून दिलंय. शशांकच्या मते, हा आत्मविश्वासच त्यांना आज या टप्प्यापर्यंत घेऊन आला. काही काळापूर्वी जेव्हा कोणी या संघाकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं, तेव्हा संघात एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला आणि ठरलं – “या वेळी आपण ट्रॉफी जिंकायची!”
मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवल्यानंतर शशांक म्हणाला, “हे सगळं काही स्वप्नासारखं वाटतंय. पण सर्वात छान गोष्ट म्हणजे आम्ही वैयक्तिक नाही, तर संघ म्हणून उभं राहत आहोत. पहिला टप्पा होता टॉप-2 मध्ये पोहोचणं – तो पार केलाय. आता दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज आहोत.”
शशांक पुढे म्हणतो, “आम्ही खूप मेहनत घेतली आहे. प्रशिक्षक, स्टाफ, व्यवस्थापन – सगळ्यांचा वाटा आहे. फक्त खेळाडू नव्हे, तर प्रत्येकाने एकत्र काम केलंय. आयपीएलसारख्या लीगमध्ये टॉप-2 मध्ये पोहोचणं काही सोपं नाही.”
पंजाब किंग्ज ही संघ कधीही आयपीएल विजेते ठरलेली नाही – त्यामुळे हा प्रवास इतकासा सोपा नव्हता. पण तरीही शशांकचं म्हणणं आहे – “अजून आपण जगाच्या टोकावर नाही पोहोचलोय. पण त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.”
संघसंस्कृतीवर जोर
शशांक सांगतो, “श्रेयस (अय्यर) माझा खूप जुना मित्र आहे. त्याच्या नेतृत्वात खेळणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याने संघात एक अशी संस्कृती रुजवली आहे – जिथे प्रत्येकाची काळजी घेतली जाते, सर्वांना मोकळेपणाने वागायला दिलं जातं. आणि रिकी सर (पॉन्टिंग) यांनीही हेच बिंबवलं – ‘आपण सगळे समान आहोत, मग तो युजी चहल असो की बस ड्रायव्हर.’”
मार्को यानसनची अनुपस्थिती संघासाठी आव्हान असू शकते, पण…
शशांक म्हणतो, “संपूर्ण सिजनमध्ये प्रत्येक सामन्यात एखादा नवीन हिरो उभा राहिलाय – कधी श्रेयस, कधी प्रभसिमरन, कधी अर्शदीप. त्यामुळे आम्हाला कोणाच्या अनुपस्थितीची भीती नाही. आमच्याकडे ११ नव्हे तर ७-८ ‘हिरो’ आहेत.”
“फायनलमध्ये आपण एकत्र खेळलो, तर ट्रॉफी आपलीच!” असे सांगत शशांकने आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला.
