IPL 2025 च्या अखेरच्या लीग सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत 7 विकेटांनी मोठा विजय मिळवला आणि थेट 19 गुणांसह पॉइंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली!
🏏 185 चा पाठलाग, आणि पंजाबची विजयी झेप!
मुंबईने दिलेलं 185 धावांचं लक्ष्य पंजाबने अवघ्या 18.3 षटकांत 3 विकेट्सवर पूर्ण करत सामन्याला तडाखेबाज फिनिश दिला.
कर्णधार श्रेयस अय्यरने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं!
💥 जोश इंगलिस – पंजाबचा पॉवरहाऊस
पंजाबच्या विजयाचा नायक ठरला जोश इंगलिस, ज्याने 42 चेंडूंमध्ये 3 षटकार, 9 चौकारांसह 73 धावांची तोफ डागली. त्याच्या या खेळीने सामना पूर्णपणे पंजाबच्या बाजूने वळवला.
⚡ प्रियांश आर्या – नव्या दमाचा स्टार
प्रियांश आर्यानेही जबरदस्त फलंदाजी करत 35 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा ठोकल्या. इंगलिस आणि प्रियांशमधील 109 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी सामन्याचं चित्रच पालटून गेलं.
🧢 श्रेयस अय्यरचा कॅप्टन क्लास
कर्णधार श्रेयस अय्यरने 16 चेंडूंमध्ये 26 धावा, तर नेहल वढेरा 2 धावांवर नाबाद राहिला. प्रभसिमरन सिंह 13 धावा काढून बाद झाला.
🔵 सूर्याचं एकाकी लढतं; मुंबईचं अपूर्ण प्रयत्न
टॉस गमावून मुंबई इंडियन्सने पहिले फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या 57 धावांच्या खेळीमुळे 184/7 धावा केल्या.
पण पंजाबच्या धारदार गोलंदाजांपुढे त्यांची एकही खेळी प्रभावी ठरली नाही.
अर्शदीप सिंह, मार्को यानसेन, आणि विजय कुमार – यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर हरप्रीत बरारने एक विकेट घेत मुंबईची घुसमट केली.
🏆 पॉइंट्स टेबलवर घमासान!
या विजयानंतर पंजाब किंग्सचे 14 पैकी 9 सामने जिंकून 19 गुण झाले, आणि त्यांनी टॉप स्थान मिळवले.
मुंबई इंडियन्सने जरी 8 सामने जिंकले असले तरी, त्यांचे 16 गुण असून ते चौथ्या स्थानावरच राहणार हे निश्चित झालं.
🔚 IPL 2025 चा शेवटचा लीग सामना
मंगळवारी IPL 2025 चा अंतिम लीग सामना RCB विरुद्ध LSG मध्ये लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
RCB आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली असून, LSG स्पर्धेबाहेर झाली आहे.
