27.6 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरदेश दुनियाअनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौकामध्ये दहशतवादी हल्ला झाला असून, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला वीरमरण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लाल चौक परिसरात तैनात पोलिसांच्या पथकावर दुपारी १२.३० च्या सुमारास गोळीबार केला. दरम्यान, या घटनेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचं नाव आशिक हुसेन असं असून, ते बडगाम जिल्ह्यातील बीरवाह येथील रहिवासी होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना त्वरित अनंतनाग येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या हुसेन यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.

हे ही वाचा:

आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके बंद

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींशी भेट

राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचा निर्लज्ज राजकीय वापर!

मोतीबिंदू आता वृद्धांपुरता मर्यादित नाही!

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच परिसरात अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्याबरोबरच शोधमोहीम सुरू असल्याने परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असताना आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यात सुरक्षा यंत्रणांनी करडी नजर ठेवली असतानाच हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिकच अलर्ट झाल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा