28 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरदेश दुनियादक्षिण आफ्रिकेत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; १७ जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; १७ जणांचा मृत्यू

८ हल्लेखोरांचा शोध सुरू

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतात शनिवारी रात्री झालेल्या भीषण गोळीबाराने परिसर हादरला आहे. जोहान्सबर्गच्या नैऋत्येला असलेल्या वेडेला टाउनशिपमधील एका बारमध्ये आठ अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास हल्लेखोर बारजवळ पोहोचले आणि सुरुवातीला बाहेर बसलेल्या लोकांना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी बारमध्ये प्रवेश करून तेथे उपस्थित लोकांवरही गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांकडे एके-४७ रायफल आणि पिस्तुले होती.
हे ही वाचा:
बलात्काराच्या वृत्तानंतर पंजाबमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांचा राडा, जाळपोळ, तोडफोड

आशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले पदक निश्चित!

बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड…नंतर कळले ते होते गिटार!
अचानक झालेल्या गोळीबारामुळे बारमध्ये आणि परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणत्याही संशयिताला अटक झालेली नाही. हल्लेखोरांची ओळख आणि त्यांच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, हल्लेखोर एकमेकांच्या संपर्कात कसे आले आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास दक्षिण आफ्रिकेतील सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या भीषण गोळीबारामुळे वेडेला टाउनशिपमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेने दक्षिण आफ्रिकेतील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा