30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरदेश दुनियामोरोक्कोच्या भूकंपात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी गमावले प्राण

मोरोक्कोच्या भूकंपात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी गमावले प्राण

जगभरातून मदतीचा ओघ सुरू

Google News Follow

Related

मध्य मोरोक्कोला शनिवारी ६.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवले. माराकेशच्या नैऋत्येस ७२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपात सुमारे दोन हजारांहून अधिक जण ठार झाले आहेत. तर, दोन हजार ५९ जण जखमी झाले. हा देशातील सहा दशकांहून अधिक काळातील सर्वांत प्राणघातक भूकंप होता.

 

 

या भूकंपानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शेजारी देश अल्जेरियाचे अनेक दशकांपासून मोरोक्कोशी संबंध चांगले नाहीत. दोन वर्षांपूर्वी शत्रुत्वपण कृत्ये केल्यावरून अल्जेरियाने मोरोक्कोशी संबंध तोडले आहेत. या देशानेही मोरोक्कोला मानवतावादी मदत देऊ केली आहे. मोरोक्कोला मानवतावादी मदत किंवा वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या विमानांना प्रवास करण्यास परवानगी देण्यासाठी आपले हवाई क्षेत्र खुले करण्याचा प्रस्ताव अल्जेरियाने दिला आहे. अल्जेरिया आणि मोरोक्को यांच्यातील सीमा सन १९९४पासून बंद आहे आणि सन २०२१ पासून हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.

 

 

अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देलमादजीद तेब्बौने यांच्या कार्यालयाने शनिवारी निवेदन प्रसिद्ध करून मोरोक्कन राष्ट्राचे अधिकारी अल्जेरियाकडून मोरोक्कन लोकांशी एकता म्हणून मानवतावादी मदत देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तर, मोरोक्कोतील अमेरिकी नागरिक सुरक्षित आहेत ना, याची खात्री करण्यासाठी अमेरिकन अधिकारी मोरोक्कोच्या संपर्कात असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. तसेच, अमेरिका मोरोक्कोच्या नागरिकांसाठी कोणतीही आवश्यक मदत देण्यास तयार आहे, असेही नमूद केले आहे.

हे ही वाचा:

भारताच्या ‘RRR’ चित्रपटाने ब्राझीलच्या अध्यक्षांना केले मंत्रमुग्ध !

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

वेंकटेश प्रसादने झुबेरला झापले, पण काँग्रेस प्रवक्त्यांचे पित्त खवळले

जम्मू काश्मीरमध्ये प्राणार्पण केलेल्या हरमिंदर यांचा मुलगा झाला लेफ्टनंट

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ‘या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत करण्यास भारत तयार आहे,’ असे नमूद केले आहे. मोरोक्कोला मदत देऊ केलेल्या इतर देशांमध्ये तुर्की, कतार, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, कतार, दुबई आणि जॉर्डन यांचा समावेश आहे. फ्रान्समध्ये, ऑरेंज या मोबाइल ऑपरेटर कंपनीने मोरोक्कोला एका आठवड्यासाठी विनामूल्य कॉलचा प्रस्ताव दिला आहे. डॉक्‍टर विदाउट बॉर्डर्स संघटनेने वाचलेल्यांना वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.

 

 

या मोठ्या भूकंपानंतर देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तर, या भयंकर भूकंपातून पुन्हा उभे राहण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असा इशारा रेड क्रॉस संघटनेने दिला आहे. ९ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठका होत आहेत. याबाबत विचारले असता, ‘यावेळी आमचे एकमात्र लक्ष मोरोक्कोच्या लोकांवर आणि या शोकांतिकेचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आहे,’ असे स्पष्टीकरण आयएमएफच्या प्रवक्त्याने दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा