29 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरदेश दुनियाफ्रान्समध्ये लूटमार, जाळपोळ करणाऱ्या अडीच हजारांना अटक

फ्रान्समध्ये लूटमार, जाळपोळ करणाऱ्या अडीच हजारांना अटक

मॅक्रॉन यांचा लुटारूंना भरपाईचा इशारा

Google News Follow

फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि शाळांमधील दयनीय परिस्थितीविरोधात सुरू झालेल्या देशव्यापी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक शहरांमध्ये दुकाने लुटणे, सार्वजनिक इमारतींना आग लावणे आणि पोलिसांशी संघर्ष केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंसाचार आणि लुटमारीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. देशभरात सुमारे २,४०० जणांना अटक करण्यात आली असून, जवळपास एक हजार पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती फ्रान्सच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे.

१८ ऑक्टोबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील भाषणात मॅक्रॉन यांनी हिंसाचाराबद्दल संताप आणि खेद व्यक्त केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्या आणि जाळपोळ, तोडफोड व लुटमार करणाऱ्यांच्या कृती यांची गल्लत करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मॅक्रॉन आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांनी कट्टर डाव्या गटांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांना जबाबदार धरले आहे. “ज्यांनी लुटमार केली, त्यांना नुकसानीची भरपाई करावी लागेल. प्रजासत्ताकाची व्यवस्था उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,” असा कठोर इशारा मॅक्रॉन यांनी दिला आहे.

हिंसक घटनांनंतर मॅक्रॉन यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठकही घेतली. सार्वजनिक इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला पोलिसांच्या मदतीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गरज पडल्यास काही ठिकाणी आंदोलनांवर बंदी घालण्याचा अधिकार स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

हे ही वाचा:

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

टायगर गोळीबारप्रकरणी तिघांना रेल्वेत पकडले

‘लष्कर’ संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

फ्रान्समधील लिमोज शहरात १९व्या शतकातील ऐतिहासिक महापालिका इमारतीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीच्या छताचा भाग कोसळला आणि संपूर्ण इमारत जवळपास उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली. लियॉन शहरात पर्यटन कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली. मार्सेई येथे काही आंदोलकांनी महापालिका इमारतीच्या प्रवेशभागात घुसण्याचा प्रयत्न केला, तर मुखवटे घातलेल्या काही व्यक्तींनी पोलीस ठाण्याची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. पॅरिससह अन्य शहरांमध्येही दुकानांच्या काचा फोडणे, वाहनांचे नुकसान करणे आणि सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा