25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरक्राईमनामाजकार्तामध्ये शाळेतील मशिदीत स्फोट; ५० विद्यार्थी जखमी

जकार्तामध्ये शाळेतील मशिदीत स्फोट; ५० विद्यार्थी जखमी

दहशतवादी हल्ल्याचा संशय पण तपास सुरू

Google News Follow

Related

इंडोनेशियातील शाळा संकुलातील एका मशिदीत शुक्रवारी नमाजादरम्यान झालेल्या स्फोटांमध्ये ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ते सगळे विद्यार्थी आहेत. अधिकाऱ्यांनी १७ वर्षीय विद्यार्थ्याला संशयित म्हणून ओळखले आहे.

हा प्रकार राजधानी जकार्ताच्या केलापा गेडिंग या परिसरातील शाळा संकुलात असलेल्या मशिदीत सुमारे १२:१५ स्थानिक वेळेनुसार घडला.

जखमींपैकी बहुतेक विद्यार्थी असून काहींना गंभीर भाजल्याच्या जखमा आहेत. संशयितही जखमी झाला आहे, अशी माहिती इंडोनेशियाचे पोलिसप्रमुख लिस्टम सिगित प्रबोवो यांनी दिली.

ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, “संशयिताने स्फोटक कसे तयार केले आणि हल्ला कसा केला” याचा तपास होत आहे.

स्फोटानंतर बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले जेणेकरून पुरावे गोळा करता येतील आणि इतर स्फोटके नसल्याची खात्री करता येईल.

हे ही वाचा:

सागरी संपत्ती, सुरक्षित सागरी मार्गांची हमी INS इक्षक 

चिकन्स नेकच्या सुरक्षेसाठी भारत- बांगलादेश सीमेवर तीन नव्या लष्करी चौक्या

आपल्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे !

“नेहरूंनी ‘वंदे मातरम’मधून माँ दुर्गेची स्तुती करणारे श्लोक जाणूनबुजून वगळले”

शाळेतील एका विद्यार्थ्याने इंडोनेशियाच्या सरकारी वृत्तसंस्था अंटाराला सांगितले की, हा घरी तयार केलेला बॉम्ब त्या विद्यार्थ्याने आणला होता, ज्याला इतर विद्यार्थी वारंवार त्रास देत असत. इतर विद्यार्थ्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की संशयित “एकटा” राहणारा होता, तो वारंवार हिंसात्मक चित्रे काढत असे आणि स्फोटानंतर त्याला जमिनीवर पडलेले आढळले.

शाळेतील एका स्वयंपाकीने सांगितले की स्फोट अत्यंत मोठा होता आणि मशिदीतून पांढरा धूर निघत होता व खिडक्या फुटलेल्या दिसल्या. आमची हृदये जोरात धडधडत होती, श्वास घेणं कठीण होतं,” असे तिने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.

जकार्ता मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दोन शस्त्रासारखी दिसणारी वस्तू जागेवर आढळल्याची पुष्टी केली. अंटारा वृत्तसंस्थेच्या छायाचित्रांनुसार, त्यातील एक वस्तू सबमशीन गनसारखी आणि दुसरी पिस्तूलसारखी दिसत होती.

सबमशीन गनसारख्या वस्तूवर “14 words. For Agartha” असे लिहिले होते. संशयिताच्या शरीरावर “Brenton Tarrant. Welcome to Hell” असे लिहिले होते.

ब्रेंटन टॅरंट हा २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथे मशिदीत झालेल्या हल्ल्याचा आरोपी आहे, ज्यात ५१ जणांचा मृत्यू झाला होता. तिथे गोळीबार झाला होता.

नंतर घटनास्थळी आलेल्या एका मंत्र्याने या वस्तू खऱ्या शस्त्र असल्याच्या चर्चा फेटाळल्या. त्यांनी CNN इंडोनेशियाला सांगितले की, प्रतिमेत दिसलेली वस्तू “खेळण्याची बंदूक होती, खरी नाही.”

मंत्री लोडेविज फ्रेडरिक पॉलस यांनी लोकांना आवाहन केले की तपास सुरू असताना या घटनेला “दहशतवादी हल्ला” मानू नये. तपासकर्त्यांना घटनास्थळी गोळ्या ठेवण्यासाठी वापरला जाणारा गडद हिरव्या रंगाचा पट्टा देखील सापडला आहे.

इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा