33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियादहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

Google News Follow

Related

भारतात दहशतवाद्यांबद्दल किंवा दहशतवादी संघटनांशी संबंधित असणाऱ्यांबद्दल काही लोक सातत्याने कळवळा दाखवत असले तरी सौदी अरेबियात मात्र याच्या अगदी उलटी स्थिती आहे. गेल्या २४ तासात तिथे परदेशातील दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या ८१ जणांना फाशी देण्यात आले आहे.

या फाशी देण्यात आलेल्यांमध्ये ७ येमेनी तर एक सिरियन नागरीक आहे. या सगळ्यांचा संबंध दहशतवादी संघटनांशी आहेच शिवाय निष्पाप बायकामुलांच्या हत्येसाठीही हे लोक जबाबदार होते.

याआधीही सौदी अरेबियाने अशीच फाशी शिक्षा दिली होती, ती १९८०मध्ये. त्यावेळी ६३ जणांना एकाचवेळी फासावर लटकाविण्यात आले होते. या लोकांनी मशिदीचा आसरा घेत राजघराण्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.

या सगळ्या लोकांना नेमकी कुठे फाशी देण्यात आली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. केवळ फाशी देण्यात आली एवढीच माहिती देण्यात आली आहे. सौदी सरकारकडून अशी कोणतीही माहिती देण्यात येत नाही. त्याबाबत ते अत्यंत कठोर आहेत.

हे ही वाचा:

भारताचे युक्रेनमधील दूतावास तात्पुरते हलवले पोलंडमध्ये

‘द काश्मीर फाइल्स’ देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!

…नाहीतर मविआच्या मंत्र्यांनी गांधींचा फोटो काढून तिथे दाऊदचा फोटो लावावा!

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

 

ही फाशीची कारवाई करण्यामागील कारण म्हणजे अल कायदा, इस्लामिक स्टेट व येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधातील पाऊल मानले जात आहे. सौदी अरेबियात दहशतवादाला कोणती वागणूक दिली जाते, त्याचा नमुना म्हणून अशा फाशीच्या कारवाया इथे सामुहिक प्रकारे होत असतात, असे बोलले जाते. सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून महिलांना वाहन चालविण्याची परवानगी व थिएटर खुली करण्याची परवानगी दिली असली तरी दहशतवादाशी संबंधितांवर मात्र फाशीची कारवाई केली जातेच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा