36 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरदेश दुनियाहाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी

हाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी

इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप; कंपनीने आरोप फेटाळले

Google News Follow

Related

भारतातील प्रसिद्ध ब्रँड एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकाचे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्याने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच आता आणखी एका देशाने या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मालदीवनेही आता निर्णय घेत या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

अहवालानुसार, मालदीवच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, या भारतीय मसाल्यांच्या ब्रँडमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळले आहे. या उत्पादनांमध्ये कीटकनाशकांची भेसळ असल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे. मात्र, एमडीएचने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे मसाला ब्रँड एमडीएचने आपल्या उत्पादनात कीटकनाशके असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे दावे खोटे आणि निराधार असून त्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड असल्याचा आरोप खोटा आहे. ग्राहकांना खात्री देतो की इथिलीन ऑक्साईडचा वापर मसाल्यांची साठवणूक, प्रक्रिया किंवा पॅकेजिंगच्या कोणत्याही टप्प्यावर केला जात नाही. आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करतो.

या आरोपांनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) देशात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय मसाला मंडळाने या बंदीच्या निर्णयाची तपासणी सुरू केली आहे.

एव्हरेस्ट आणि एमडीएच उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर सिंगापूर आणि हाँगकाँगने काही मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तेव्हापासून या उत्पादनांची अमेरिका आणि भारतात चाचणी सुरू आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही मसाल्यांची माहिती घेत आहोत. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका असतो. अशातच एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या विक्रीवर मालदीवमध्येही बंदी घालण्यात आली आहे. मालदीवच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाचे म्हणणे आहे की या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळले आहे. आता मालदीव सरकार या मसाल्यांच्या धोक्याची चाचणी करत आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प

छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक, सुकमामध्ये एक नक्षलवादी ठार!

दादरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त

काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेल्या अमित शाह यांच्या एडिटेड व्हिडीओविरोधात गुन्हा दाखल

एमडीएच ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याचं हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागानं म्हटलंय. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळल्याचं म्हटलं जातंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा