31 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरविशेषछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प

पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला अपघात; सर्व प्रवासी सुखरुप

Google News Follow

Related

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेनचा अपघात झाला असून परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ (CSMT) लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही गाडी पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती तेव्हा हा अपघात झाला.

सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात असलेल्या लोकल गाडीचा एक डबा रुळावरून घसरला. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मात्र, या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

माहितीनुसार, सकाळी ११.३५ वाजता सीएसएमटी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवेश करत असताना लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. यामुळे डब्यात बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. अचानक झालेल्या या घटनेमुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, मोटरमनने तातडीने नियंत्रण मिळवत लोकल ट्रेन थांबवली. लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वे रुळावर घाबरून उड्या घेतल्या. त्यानंतर रेल्वे रुळावरून चालत त्यांनी सीएसएमटी स्थानक गाठले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.

हे ही वाचा:

छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक, सुकमामध्ये एक नक्षलवादी ठार!

दादरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त

काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेल्या अमित शाह यांच्या एडिटेड व्हिडीओविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक!

दरम्यान, हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न काम सुरू केले आहेत. यामुळे वडाळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून रेल्वे सेवा थोड्याच वेळात पूर्णपणे सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा