29 C
Mumbai
Saturday, September 12, 2026
घरदेश दुनियाब्रिटनमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; १ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द

ब्रिटनमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; १ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द

एअर इंडियाच्या उड्डाणांवरही परिणाम

Google News Follow

Related

ब्रिटनमधील एअर ट्रॅफिक कंट्रोल सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. या तांत्रिक समस्येमुळे १ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द, तर अनेक उड्डाणे विलंबाने धावली. ब्रिटनमधील प्रमुख विमानतळांवर याचा मोठा परिणाम झाल्याने हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

ब्रिटनमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलचे संचालन करणाऱ्या नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस (NATS) च्या फ्लाइट प्रोसेसिंग सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. या बिघाडामुळे विमानांच्या ये-जा नियंत्रित करण्यात अडथळे निर्माण झाले आणि त्याचा परिणाम देशभरातील विमान वाहतुकीवर झाला. फ्लाइट ट्रॅकिंग सेवा Flightradar24 च्या माहितीनुसार, लंडनच्या हीथ्रो विमानतळासह एडिनबर्ग, मँचेस्टर, ल्यूटन, बर्मिंगहॅम, एबरडीन आणि ग्लासगो विमानतळांवर या बिघाडाचा परिणाम झाला. मंगळवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमधील विविध विमानतळांवर १ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांच्या आकडेवारीतून समोर आले.

NATS ने सुरुवातीला इंजिनिअर्स तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तांत्रिक उपाय लागू करून समस्या दूर करण्यात आल्याचे NATS कडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, उड्डाणांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी आणि रद्द तसेच रखडलेल्या उड्डाणांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो, असा इशाराही देण्यात आला.

या तांत्रिक बिघाडाचा परिणाम ब्रिटनबाहेरील विमान वाहतुकीवरही झाला. डब्लिन विमानतळाने ब्रिटनमधून येणाऱ्या आणि ब्रिटनकडे जाणाऱ्या विमानसेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. ब्रिटिश एअरवेजसह अनेक विमान कंपन्यांच्या सेवांनाही याचा फटका बसला.

हे ही वाचा:

इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर अमेरिकेचा हल्ला

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

रोहन पारीखला दिले होते पंतप्रधानांच्या खोट्या सहीचे ओळखपत्र

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

एअर इंडियाच्या उड्डाणांवरही परिणाम

दरम्यान, ब्रिटनमधील या तांत्रिक बिघाडाचा परिणाम एअर इंडियाच्या काही विमानसेवांवरही झाला आहे. ब्रिटनमधील विमानतळांवरून ये-जा करणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलावे लागले, काही उड्डाणे उशिराने चालवावी लागली, तर काही रद्द करण्यात आली. या व्यत्ययामुळे विमाने आणि क्रू त्यांच्या नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचू न शकल्याने इतर काही उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता एअर इंडियाने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची स्थिती तपासावी, असे आवाहन एअर इंडियाने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा